- rat०६p२.jpg-
२५O०२७२९
रत्नागिरी ः येथील विमानतळाजवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. क्रेनद्वारे त्यांना भलामोठा हार घालण्यात आला.
----
रवींद्र चव्हाण यांचे करबुडे येथे स्वागत
बैठका रद्द ; भाजप दक्षिण रत्नागिरीतर्फे शक्तीप्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. करबुडेफाटा व विमानतळावर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहात भाजप दक्षिण रत्नागिरीतर्फे शक्तीप्रदर्शन करण्यात आले; मात्र रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांची बैठक रद्द करण्यात आली.
खेड व चिपळूण येथील भाजप कार्यकर्ते प्रवेश व मेळावा संपवून चव्हाण रत्नागिरी विमानतळावर थेट दाखल झाले. सावंतवाडी येथे जाण्यासाठी विलंब झाल्याने त्यांनी रत्नागिरीतील कार्यक्रम रद्द केला. त्याचप्रमाणे आपल्या मार्गातही त्यांनी बदल करत हातखंबाऐवजी उक्षीमार्गे रत्नागिरीत आले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी हातखंबाऐवजी करबुडेफाटा येथे त्यांचे जोरदार स्वागत केले. भाजपचे रत्नागिरी तालुक्यातील तीन मंडळांचे अध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे व प्रतीक देसाई यांच्यासह सरचिटणीस सुशांत पाटकर, उमेश देसाई, महेश खानविलकर, निखिल बोरकर, गुरूदास गोविलकर, संतोष बोरकर, रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, डॉ. विनय नातू, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, राजेश सावंत, प्रदेश महिला पदाधिकारी शिल्पा मराठे आदी उपस्थित होते.