- rat६p१०.jpg-
२५O०२७७२
चिपळूण ः रोहन म्हापुसकर यांचा सत्कार करताना सागर देशपांडे.
----
कलेचा राजकारणासह समाजकारणातही वापर
सागर देशपांडे ः चिपळूणमधील अभिनय कार्यशाळेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः चिपळूणमध्ये नाट्यसंमेलनानिमित्त १९९५ ला नाटकाचे बीज रूजले आणि आज ते वृक्षासारखे फोफावले आहे. अभिनय-दिग्दर्शनात कोकणातील कलाकारांना मोठी संधी आहे त्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. अभिनय, दिग्दर्शन आणि भूमिकेतील बदल या कलांचा आता राजकारण आणि समाजकारणातही वापर होत आहे, असे प्रतिपादन विचारवंत डॉ. सागर देशपांडे यांनी केले.
अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूण आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोनदिवसीय अभिनय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते झाले. डॉ. देशपांडे म्हणाले, ‘पूर्वी सराव कार्यशाळा फारशा घेतल्या जात नव्हत्या; मात्र आता अभिनयाच्या प्रशिक्षणाला प्रगतीचा नवा वेग मिळाला आहे. महाराष्ट्रातील नाटकांची खरी परंपरा कोल्हापुरातून सुरू झाली. खाडिलकर, देवल, विष्णुदास भावे यांच्या कार्यातून ती समृद्ध झाली. हीच परंपरा आता कोकणातही नवे रूप घेत आहे. अभ्यासपूर्वक प्रयत्न केले तर या क्षेत्रात कोकणातून क्रांती घडू शकते,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कलाकारांच्यावतीने संजय वाजे आणि मीरा पोतदार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, सचिव डॉ. मीनल ओक, उपाध्यक्ष दिलीप आंब्रे, खजिनदार विभावरी रजपूत, आदिती देशपांडे, ओंकार रेडीज, योगेश कुष्टे, संजय कदम, श्रवण चव्हाण, योगेश बाडांगळे, समिधा बांडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
---
चौकट
कृत्रिम बुद्धिमत्तेला घाबरू नये
जगात सध्या सात हजारांहून अधिक बोली भाषा बोलल्या जातात. त्यातील ७० ते ८० भाषा दरवर्षी नष्ट होतात. मराठी ही जगात १५व्या क्रमांकावर असून, १२ ते १३ कोटी लोकं ती बोलतात. ही भाषा, तिचं नाटक आणि तिचा चित्रपट यांचं अस्तित्व टिकवणं आपली जबाबदारी आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रपट क्षेत्रात जर आपल्याकडे गुणवत्ता असेल तर कृत्रिम बुद्धिमत्तेला घाबरण्याचं काहीच कारण नाही, असे देशपांडे यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.