swt612.jpg
02783
कुडाळः पत्रकार परिषदेत बोलताना रणजित देसाई. बाजूला मनीष दाभोलकर, प्रशांत धोंड, प्रफुल्ल वालावलकर, अतुल सामंत, रोहन देसाई, मनोज वालावलकर, अभय सामंत, गुरू देसाई, सचिन देसाई, तृप्ती प्रभूदेसाई आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
कुडाळात आजपासून ‘केपीएल’ महोत्सव
रणजित देसाईः देशभरातील तब्बल ८५० खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ः येथे ७, ८ व ९ नोव्हेंबर या कालावधीत १० व्या कुडाळदेशकर प्रीमियर लीग (केपीएल) २०२५ या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. यासाठी देशभरातून सुमारे ८५० खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. सुमारे १३०० ते १४०० ज्ञाती बांधव या महोत्सवात सहभागी होणार आहेत. या क्रीडा महोत्सवाबरोबरच ज्ञाती बांधवांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कला प्रदर्शन यांचेही आयोजन केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली.
येथील मराठा समाज सभागृहात या महोत्सवाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष रणजित देसाई, क्रीडा संघटक मनीष दाभोलकर, केदार सामंत, प्रशांत धोंड, प्रफुल्ल वालावलकर, अतुल सामंत, रोहन देसाई, मनोज वालावलकर, अभय सामंत, गुरू देसाई, सचिन देसाई, तृप्ती प्रभूदेसाई, विपुल प्रभू, श्रीकृष्ण सामंत, साहिल देसाई, सागर नाईक, मनोज तेंडुलकर, विकास वाघ, श्री व्यंकटेश एंटरप्राइजेसचे यश बांदेकर, हर्षल लोट आदी उपस्थित होते.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्यावसायिक व स्थानिक कलाकारांकडून ७ व ८ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता पु. ल. देशपांडे रंगमंच, बॅ. नाथ पै. संकुल येथे ‘सब कुछ कुडाळदेशकर’ असा सांस्कृतिक कार्यक्रम ज्ञातीबांधवांनी बसविलेले दशावतारी नाटक सादरीकरण होणार आहे. त्यानंतर स्नेहभोजन होईल. दहाव्या क्रीडा महोत्सवाचे प्रमुख पाहुणे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, रणजित देसाई, जगदीश वालावलकर, मनीष दाभोलकर, कर्नाटक संस्थाध्यक्ष महेश ठाकूर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. ८) सकाळी ७.३० वाजता उद्घाटन सोहळा सुरू होईल. त्यात मशाल, शपथविधी, सत्कार, शुभेच्छापर भाषण, त्यानंतर क्रिकेट व इतर खेळांचे सामने सुरू होतील. रविवारी (ता. ९) दुपारी अडीच वाजता अंतिम सामना व नंतर बक्षीस वितरण कार्यक्रम होईल. या दोन्ही कार्यक्रमांस समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, क्रीडा जगतातील खेळाडू, उद्योजक व पत्रकार उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्या (ता. ७) कुडाळदेशकर ज्ञातीबांधवांच्या भारतातील संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे देसाई यांनी सांगितले.
चौकट
कुडाळमध्ये प्रथमच कलादालन प्रदर्शन
प्रथमच समाजातील कलाकारांचे राष्ट्रीय स्तरावरचे कला प्रदर्शन येथील कला दालनामध्ये आयोजित केले आहे. ज्येष्ठ चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बी. जी. सामंत उपस्थित राहून कलादालनाची आखणी करणार आहेत. चित्रकला, शिल्पकला व हस्तकला सादर केली जाईल. या कलादालनातील कलाकृतीचा आस्वाद जिल्ह्यातील विद्यार्थी व कला रसिकांनी घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी यावेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.