कोकण

फूलशेतीतून अक्षय बदडने मिळवले उत्पन्न

CD

- rat७p१९.jpg
२५O०२९८१
साखरपा : अक्षय बडद यांच्या शेतात फुललेली झेंडूची रोपे.
----
भातशेतीतून झेंडूकडे यशस्वी वळण
धामणीतील बडद यांची १५ गुंठ्यातून १ टन फुलांची कमाई
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ७ : पारंपरिक भातशेतीपेक्षा वेगळे प्रयोग सध्या ठिकठिकाणी सुरू आहेत. धामणी येथील अक्षय बडद या तरुणाने झेंडूच्या लागवडीतून उत्पन्न मिळवले आहे. यंदा १५ गुंठ्यातून १ टन उत्पादन मिळाले आहे.
धामणी येथे बडद हे पारंपरिक भातशेती करत आहेत. बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन पर्यायी शेतीचा विचार सुरू केला. त्यामधूनच ते झेंडू लागवडीकडे वळले. वडिलोपार्जित जमिनीत प्राथमिक प्रयोग म्हणून १५ गुंठे क्षेत्रात त्यांनी झेंडूची लागवड केली. त्यासाठी त्यांनी टेनिस, अक्षगंध आणि कलकत्ता या जातींच्या वाणांची निवड केली आहे. १५ गुंठ्यात ५ हजार रोपांची लागवड केली. गणेशोत्सवापासून त्यामधून उत्पादन सुरू झाले. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या कालावधीत एक टन फुलांची काढणी त्यांनी केली. स्थानिक बाजारात १२० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहे.

दृष्टिक्षेपात
पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून फूलशेती
१५ गुंठे क्षेत्रात लागवड
टेनिस, अक्षगंध आणि कलकत्ता रोपांची लागवड
गणेशोत्सव काळापासून फूल काढणीला सुरुवात
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs ZIM : ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात? झिम्बाब्वेच्या अविश्वसनीय विजयाने 'ब' गटाचे समीकरण बदलले...

Rohit Patil : "‘जंगलात भरली लांडग्यांची सभा’; रोहित पाटील यांच्या पोस्टने जिल्हा राजकारणात खळबळ!"

Latest Marathi News Live Update : जालन्यात आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक

Valentine Week : व्हॉलिबॉलच्या मैदानावर फुललेलं प्रेम! कोच अभय आणि अंजली यांची रंजक प्रेमकहाणी; 37 वर्षांनंतरही 'रोझ डे'ने ताजा केला आठवणींचा सुगंध

Mumbai Fire: मुंबईत लोअर परळ वर्कशॉपमध्ये आग, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

SCROLL FOR NEXT