कोकण

‘टीमवर्क’ हा सर्वोत्तम यशाचा मूलमंत्र

CD

03351

‘टीमवर्क’ हा सर्वोत्तम यशाचा मूलमंत्र

हणमंतराव गायकवाड ः कुडाळात ‘एमआयडीसी’तर्फे व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः तुम्ही जे काम करता, ते सर्वोत्तम कसे होईल, त्याकडे लक्ष द्या. तुमची टीम चांगली असली पाहिजे. जगात संधी खूप आहेत. ध्येय ठेवून काम करा. एकत्र येऊन काम करा, असा संदेश उद्योजक, बीव्हीजी कंपनीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी दिला.
कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत गायकवाड यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या मुलांनी गायलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सचिव अॅड. नकुल पार्सेकर, आनंद बांदिवडेकर, कौसर खान, अमित वळंजू, शशी चव्हाण, संजीवकुमार प्रभू, सीए सुनील सौदागर अॅड. अजित भणगे, राजू तेर्से, राजीव पवार, मंगेश तेरसे, एम. के. गावडे, प्रज्ञा परब, सचिन मदने, गणेश म्हाडदळकर, योगेश नाडकर्णी, राज चव्हाण आदी उपस्थित होते. 
श्री. गायकवाड म्हणाले, ‘तुम्ही सर्वांनी तुमच्या आयुष्यात काय बदल करायचा आणि तुमच्यामुळे लोकांच्या आयुष्यात कोणता बदल होणार आहे, याबद्दलचा विचार करा. पुढच्या दहा वर्षांत १० लाख लोकांना रोजगार आणि १० कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्यासाठी मदत करण्याचा मानस आहे. जी काही संपत्ती मिळेल, त्यापैकी कमीतकमी ९० टक्के संपत्ती समाजासाठी खर्च करेन.’
मोहन होडावडेकर यांनी स्वागत केले. सचिन मदने यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. पार्सेकर यांनी आभार मानले.
...................
‘बीव्हीजी’मुळे नावलौकिक मिळाला
उद्योजक गायकवाड म्हणाले, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी विविध संस्थांचे जाळे उभे केले. सामाजिक बांधिलकी म्हणून आळंदी, पंढरपूर आणि तुळजापूरची मंदिरे विनामूल्य साफ करायचे काम स्वीकारले. अवघ्या आठ सहकाऱ्यांच्या मदतीने ‘बीव्हीजी’चे काम सुरू झाले आणि या माध्यमातून यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT