swt९६.jpg मध्ये फोटो आहे.
मालवण ः ठाकरे शिवसेनेच्या तालुका समन्वयक पूनम चव्हाण, माजी नगरसेविका नीना मुंबरकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आमदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
‘मालवण’ राज्यात आदर्शवत बनवू
आमदार नीलेश राणे ः दर्जेदार विकासकामांनाच असेल प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : जनतेची सेवा करताना सर्व विकासकामे पूर्ण करणे हेच आपले पहिले कर्तव्य आहे. शेकडो कोटी निधी या मतदारसंघात प्राप्त झाला असून आगामी काळातही विकासनिधी कमी पडू देणार नाही. होत असलेली विकासकामे दर्जेदार व्हायला हवीत, याकडेही आपले प्राधान्याने लक्ष असेल. मालवण पालिका महाराष्ट्रात आदर्शवत आणि दर्जेदार अशीच बनवणार, असा विश्वास आमदार नीलेश राणे यांनी येथे व्यक्त केला.
आमदार नीलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शहरातील ठाकरे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, नागरिकांनी शनिवारी (ता. ८) शिवसेनेत प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार राणे यांनी शिवसेना पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, शहरप्रमुख दीपक पाटकर, कुडाळ-मालवण सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना विधानसभा प्रमुख प्रीतम गावडे, महिला जिल्हा संघटक अंजना सामंत, तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, स्नेहा घाडीगावकर आदी उपस्थित होते.
आमदार राणे यांनी, विकासनिधीत शिवसेना म्हणून कुठेच कमी पडणार नाही. कुडाळ-मालवणमध्ये शिवसेना नंबर एकचाच पक्ष राहणार, असा विश्वास व्यक्त केला. आमदार राणे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन कुडाळ-मालवण मतदारसंघात पक्ष प्रवेशांचा धडाका सुरू आहे. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे, असे सांगत जिल्हाप्रमुख सामंत व कांदळगावकर यांनी आमदार राणे यांच्या कार्याचा गौरव केला.
---
आमदारांसोबत काम करण्याची संधी!
आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वात पुढील १५ ते २० वर्षे काम करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. हे आमचे भाग्यच आहे. जनतेसोबत आणि मतदारांसोबत नेहमीच प्रामाणिक राहणार, असे प्रवेशकर्त्या पूनम चव्हाण यांनी स्पष्ट केले. ठाकरे शिवसेना तालुका समन्व्यक पूनम चव्हाण, उपशहर प्रमुख यशवंत गावकर, माजी नगरसेविका नीना मुंबरकर आदींनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.