कोकण

देवरुखात महिला मतदार ठरवणार विजय

CD

विजयाची किल्ली महिलांच्या हातात
देवरुखात ११ केंद्रावर मतदार; तीन ठिकाणी तपासणी केंद्र
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १० ः देवरूखमध्ये १७ प्रभागातील ११ केंद्रावर मतदान होणार आहे. भोंदे शाळा क्रमांक ३ मध्ये तीन मतदान केंद्र असून काही शाळांमध्ये दोन मतदान केंद्रे आहेत. शहरात तीन ठिकाणी तपासणी केंद्रे व फिरती पथके लक्ष ठेवायला सज्ज करण्यात आली आहेत.
देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवार अर्ज स्वीकारणार असून, त्याची वेळ सकाळी १० ते ३ अशी असणार आहे. १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदान २ डिसेंबरला, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
नगरपंचायत इमारतीत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय व मतपेट्यासाठी स्टाँग रूम असून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणीही नगरपंचायतीच्या आवारात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवरुख नगरपंचायतीसाठी ५२०८ पुरुष आणि ५५८१ महिला मतदार आहेत. महिलांची संख्या जास्त असल्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या विजयात महिलांचा वाटा मोठा असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Red Fort Explosion : राजधानी दिल्ली हादरली! लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट ; तीन गाड्यांना आग

Mumbai Pod Taxi: मुंबईत सुरू होणार ‘स्मार्ट ट्रॅव्हल युग’! पॉड टॅक्सी प्रकल्प NCMC कार्डशी जोडला जाणार, आता प्रवास अधिक सोपा

Latest Marathi Breaking News: लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट; दिल्लीत हायअलर्ट जारी, एकाचा मृत्यू

Kullu Village Fire : हिमाचलच्या कुल्लुमधील गावात भीषण अग्नितांडव!, बघता बघता गावच पेटलं

Gold-Silver Price: सोन्याच्या दरात उसळी! तब्बल 'इतक्या' रुपयांची वाढ, भविष्यात दर कसे असतील?

SCROLL FOR NEXT