कोकण

रत्नागिरी-आरोग्य सेवेत रत्नागिरी रोल मॉडेल ठरेल

CD

आरोग्य सेवेत रत्नागिरी रोल मॉडेल ठरेल
वैदेही रानडे ; मानसिक आरोग्य व प्राथमिक आरोग्य सेवा कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः मानसिक आरोग्य व प्राथमिक आरोग्य सेवा महत्वाची आहे. चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा राज्यात ''रोल मॉडेल'' म्हणून अग्रस्थानी असेल, असा विश्वास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी व्यक्त केला.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य मानसिक आरोग्य व प्राथमिक आरोग्य सेवा कार्यशाळेच्या समारोपावेळी त्या बोलत होत्या. ही कार्यशाळा स्वयंवर सांस्कृतिक भवनात झाली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी प्रास्ताविक सादर केले. याप्रसंगी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, उपसचिव कैलास साळुंके, उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप आदी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात प्राथमिक आरोग्य सेवा विषयावर, तर दुपारच्या सत्रात मानसिक आरोग्य सेवा विषयावर सखोल चर्चासत्रे आयोजित केली होती.
सचिव डॉ. निपुण विनायक यांनी विशेषतः तालुका वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तसेच आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचे गट तयार करून त्यांच्याशी थेट संवाद साधला. कामाबद्दलच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर, आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक प्रभावीपणे आणि लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी आवश्यक दिशानिर्देशन व मार्गदर्शन केले. मानसोपचार तज्ञ डॉ. शास्वत शेरे यांनी यावेळी मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. दिलीप माने, डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि डॉ. भास्कर जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद नसता तर मला ही संधी मिळाली नसती - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

SCROLL FOR NEXT