शेतकऱ्यांचे मित्र ः पक्षी भाग २-------------लोगो
(४ नोव्हेंबर टुडे ३)
वनस्पतींच्या बीज
प्रसारात पक्ष्यांचे महत्व
जैविक खतांचा स्रोत - पक्ष्यांची विष्ठा शेतासाठी नैसर्गिक खत म्हणून काम करते जी मातीची सुपीकता वाढवते.
नैसर्गिक परिसंस्थेचे संतुलन - पक्षी हे परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि ते अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे साठिक जैवविविधता आणि अन्नसाखळी चांगल्या पद्धतीने कार्यरत राहण्यास मदत होते.
- rat१०p२.jpg-
२५O०३५१२
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी
सृष्टीज्ञान संस्था
----
शेतीप्रक्रियांमध्ये पक्षी निभावत असलेल्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी कृषी पक्षीशास्त्र ही वेगळी शाखा आहे. पक्ष्यांच्या आहारविहारविषयक सवयींमधून त्यांची शेतीतील भूमिका ठरते.
नैसर्गिक कीटक नियंत्रण ः कीटकांमधील विविधता़, त्यांची अचाट प्रजोत्पादन क्षमता आणि अधाशीपणे खाण्याची सवय यामुळे शेतीचे खूप नुकसान होते. अनेक कीटकांच्या अळ्या या दिवसातून दोनवेळा त्यांच्या वजनाइतकेच अन्नग्रहण करतात. कोवळी पाने खाणाऱ्या अळ्या चोवीस तासांत त्यांच्या वजनाच्या दोनशेपट अन्न खातात. हे लक्षात घेता कीड-नियंत्रणात पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चिमण्या, कावळे, नीलकंठ, सुगरण, वेडा राघू, साळुंकी, खाटीक, माशीमार, चंडोल, वटवटे, पाकोळ्यासारख्या स्थानिक पक्ष्यांच्या बरोबरीने भोरड्या आणि मैनासारखे स्थलांतरित पक्षीही मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान करणारे कीटक खातात. यामुळे रासायनिक कीटकनाशकांची गरज कमी होते. अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकच खात नाहीत तर त्यांची अंडीही मोठ्या प्रमाणावर फस्त करून टाकतात. त्यामुळे वेगवेगळ्या अवस्थेतील कीटक उदा. अंडी, अळी, कोष, पूर्ण वाढ झालेले कीटक हे पक्ष्यांकडून खाल्ले जातात त्यामुळे कीटकांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रित राखण्यास मदत होते.
परागीभवन ः शेतीमध्ये उत्तम उत्पादन येण्यासाठी परागीभवन ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. अन्नासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींपैकी सुमारे ५ टक्के वनस्पतींचे परागीभवन हे पक्ष्यांद्वारे होते. काही वनस्पतींच्या प्रजातींसाठी सूर्यपक्षी हे महत्त्वाचे परागवाहक आहेत. ज्वारी, बाजरी, सूर्यफूल यांसारख्या पिकांच्या फुलोरा अवस्थेत सुगरण, सातभाई, वटवटेसारखे पक्षी कीटक खात असताना परागीभवन घडून येते. परिणामस्वरूपी उत्तम धान्य उत्पादन मिळते.
बीज प्रसार ः अनेक पक्षी फळे आणि त्यांच्या बिया विष्ठेद्वारे बाहेर टाकतात. हे वनस्पतींच्या नैसर्गिक प्रसारासाठी आणि पुनरुत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. बोरवर्गीय प्रजाती, कडुलिंब, वड, उंबर, पिंपळासारख्या अनेक प्रजातींच्या वनस्पतींची फळे बुलबुल़, मैना, कोकिळा, सातभाई, तांबट, धनेश, कबुतरे हे पक्षी खातात आणि न पचलेल्या बिया त्यांच्या विष्ठेद्वारे बाहेर टाकतात. अनेक बियांवर कडक आवरण असते त्यामुळे त्या रुजायला वेळ लागू शकतो; मात्र पक्ष्यांच्या पचनसंस्थेत या बियांवरील आवरण निघून जाऊन त्या लवकर रूजतात. त्यामुळे वनस्पतींचा बीजप्रसार होऊन वनीकरण वाढायला पक्ष्यांची मदत होते.
उंदरासारख्या उपद्रवी प्राण्यांपासून संरक्षण करणारे पक्षी ः शेतात तयार झालेल्या आणि आपल्या गोदामात साठवलेल्या गहू-तांदूळसारख्या धान्यांचे १० ते ५० टक्के नुकसान उंदरांमुळे होत असते. शेताची आणि अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या तसेच प्लेग, लेप्टोस्पायरोसिस यासारख्या आजारांना आमंत्रण देणाऱ्या उंदीर-घुशींवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम हे गरूड, ससाणा, घुबड, पिंगळा यासारखे शिकारी पक्षी करत असतात. त्यामुळे ते शेतीसाठी अत्यंत उपयोगी ठरतात.
जैविक खतांचा स्रोत ः पक्ष्यांची विष्ठा शेतासाठी नैसर्गिक खत म्हणून काम करते जी मातीची सुपीकता वाढवते.
नैसर्गिक परिसंस्थेचे संतुलन ः पक्षी हे परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि ते अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे जैवविविधता आणि अन्नसाखळी चांगल्या पद्धतीने कार्यरत राहण्यास मदत होते. हे लक्षात घेऊन पक्ष्यांसाठी बांधांवर झाडे लावली जावीत. पक्ष्यांच्या घरट्यांना संरक्षण मिळावे तसेच पीकरचना आणि पक्ष्यांमुळे शेतीला होणारे फायदे आणि नुकसान यांचे योग्य संतुलन राखण्याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांनी स्थानिक पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे.
(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)