कोकण

रत्नागिरीत लक्ष्मीकांताचा उत्सव

CD

वेरळ येथे शुक्रवारपासून
लक्ष्मीकांताचा वार्षिकोत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : श्री लक्ष्मीकांताचा प्रतिवार्षिक उत्सव १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत वेरळ (ता. लांजा) येथील श्रीक्षेत्र लक्ष्मी केशव मंदिर येथे साजरा होणार आहे.
यावर्षी उत्सवाचे व्यवस्थापन अरुण देव, सुभाष देव (पुणे), अरविंद देव रतलाम् व देव कुटुंबातील इतर मंडळी करणार आहेत. उत्सवात दररोज रात्री ८.३० वाजल्यापासून आरत्या, भोवत्या, मंत्रपुष्पांजली, कीर्तन, दीपोत्सव पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहेत.
उत्सवात कीर्तनसेवा दत्तात्रय उपाध्ये (कुडाळ) करणार आहेत. त्यांना संवादिनीसाथ योगेश सरपोतदार व तबलासाथ प्रसाद पटवर्धन करणार आहेत. १६ व १७ नोव्हेंबर व १९ व २० रोजी दुपारी १ वा. सर्व भक्तांना महाप्रसाद दिला जाणार आहे. १९ रोजी सायंकाळी दीपोत्सव साजरा होईल. २० ला ज्येष्ठ नागरिकांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उत्सवात बाहेरगावाहून येणाऱ्यांनी निवास व भोजनव्यवस्थेसाठी अंजली गुणे किंवा सुरेश गुणे यांच्याशी संपर्क साधावा. तसेच उत्सवासाठी देणगी लक्ष्मीकेशव संस्था, वेरळ या नावाने धनादेशाद्वारे पाठवावी, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : तीन वेळा जमिनीवर आपटलो, दूरपर्यंत आगीच्या ज्वाळा... दिल्ली स्पोटातील प्रत्यक्षदर्शींने सांगितला हादरवणारा प्रसंग

Delhi Blast : दिल्लीत २९ वर्षांत किती वेळा झाले स्फोट? संपूर्ण माहिती वाचा एका ठिकाणी

Delhi Blast: दिल्ली स्फोटात आठ जणांचा मृत्यू, शरीराच्या चिंधड्या उडाल्या, डझनभर गाड्या जळून खाक; जखमींचा आकडा मोठा, नेमकं काय घडलं?

Delhi Red Fort blast Live Update : गृहमंत्री अमित शहा यांनी आयबी प्रमुखांकडून घेतली माहिती

Delhi Red Fort Explosion : राजधानी दिल्ली हादरली! लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट ; तीन गाड्यांना आग

SCROLL FOR NEXT