कोकण

सहा तालुक्यातील भूजल पातळीत वाढ

CD

सहा तालुक्यातील भूजल पातळीत वाढ
सततचा पाऊस ; विहिरी तुडुंब भरलेल्या, टंचाईची भीती दूर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः यंदा सतत पाऊस, अतिवृष्टीमुळे बहुतांश प्रकल्प विहिरी, बोअरवेल आणि शेततळी पाण्याने भरलेल्या आहेत. जमिनीतही पाणी चांगल्याप्रकारे मुरले आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई कमी जाणवेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेद्वारे केलेल्या भूजल पातळी सर्व्हेक्षणात ६ तालुक्यात भूजल पातळीत वाढ आहे तर अन्य तीन तालुक्यातील पाणीपातळीत मागील पाच वर्षाची सरासरी पाहता वाढ झालेली नाही.
जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सतत पाऊस कोसळत होता. तरीही जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला आहे.
मागील पाच वर्षामध्ये जिल्ह्याची पाणीपातळी ३ मीटर होती. यंदाच्या सप्टेंबर महिन्यातील पाणीपातळी २.७५ मीटरएवढी आहे. त्यामुळे मागील पाच वर्षात ०.२५ ने कमी झाली आहे. तरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात पाणीटंचाई कमी कशी करता येईल यासाठी प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यात ६८ धरणे आहेत. जिल्ह्यात यंदा उशिरा पाऊस पडल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेनुसार, जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. यावर्षी पाण्याची फारशी टंचाई जाणवणार नाही. जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत सतत पाऊस पडल्याने विहिरींचा जलस्तर वाढला आहे शिवाय बोअरवेललाही मुबलक पाणी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई कमी प्रमाणात जाणवणार असून, टॅंकरचा खर्च वाचणार आहे.
---
चौकट
भूजल पातळी मोजणी कशी अशी केली जाते..
जिल्ह्यातील ६७ निरीक्षण विहिरींतील स्थिर पाणीपातळीची नोंद घेतली जाते व त्यांची तुलना मागील पाच वर्षातील पाणीपातळीशी केली जाते यावरून संबंधित तालुक्यातील भूजलपातळी वाढली की, कमी झाली हे निदर्शनास येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Red Fort Explosion : राजधानी दिल्ली हादरली! लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट ; तीन गाड्यांना आग

Mumbai Pod Taxi: मुंबईत सुरू होणार ‘स्मार्ट ट्रॅव्हल युग’! पॉड टॅक्सी प्रकल्प NCMC कार्डशी जोडला जाणार, आता प्रवास अधिक सोपा

Latest Marathi Breaking News: लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट; दिल्लीत हायअलर्ट जारी, एकाचा मृत्यू

Kullu Village Fire : हिमाचलच्या कुल्लुमधील गावात भीषण अग्नितांडव!, बघता बघता गावच पेटलं

Gold-Silver Price: सोन्याच्या दरात उसळी! तब्बल 'इतक्या' रुपयांची वाढ, भविष्यात दर कसे असतील?

SCROLL FOR NEXT