rat10p3.jpg
03513
पावसः गणेशगुळे येथे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिलालेखाचे अनावरण करताना मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे. (छाया ः सुधीर विश्वासराव, पावस)
----------
हिंदू राष्ट्राला सक्षम करण्याचा संदेश
मंत्री राणेंचे कौतुकोद्गार : गणेशगुळ्यात वासुदेव बळवंत फडकेंच्या शिलालेखाचे अनावरण
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १० ः महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे, हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेला असून, राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान यांचे हे मोठे काम आहे, असे उद्गगार मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी काढले.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळस्थानी म्हणजेच रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे शिलालेखाचे अनावरण मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या वेळी माजी सरपंच श्रावणी रांगणकर, राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत सहकार्यवाहिका पद्मजा अभ्यंकर, रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरीच्या अध्यक्ष दीपा पाटकर, जिल्हा दक्षिण रत्नागिरी कार्यवाहिका मीरा भिडे, कोकण प्रांत सहकार्यवाहिका उमा दांडेकर आदी उपस्थित होते. समिती शाखेच्यावतीने ध्वजारोहण, घोषवादन, प्रार्थना, ध्वजावतरण, शिवस्तुती पठण, सेविकांची विविध प्रात्यक्षिके आदी कार्यक्रम झाले.
या प्रसंगी मंत्री राणे म्हणाले, अतिशय शिस्तबद्ध असलेला हा कार्यक्रम मनाला स्पर्श करणारा होता. या गावाला भेट देणाऱ्या लोकांसाठी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा हा शिलालेख त्यांच्या कार्याचा परिचय करून देईल त्याशिवाय समितीचे अनेक उपक्रम चांगले आहेत. कोकणात स्त्रीशक्ती प्रबळ असताना ती भक्कम बनवण्याची मोठे काम राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान या उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे. हे सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक आहेत.
चौकट
कुटुंबातील संवाद वाढवणे गरजेचेः पद्मजा अभ्यंकर
प्रमुख वक्त्या पद्मजा अभ्यंकर यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याची माहिती देतानाच शिक्षण आणि ध्येयपूर्ती हे जगण्यासाठी महत्त्वाची गोष्ट असून, त्यातूनच राष्ट्र आणि धर्माचा विचार केला पाहिजे. यासाठी कुटुंबातील संवाद वाढवणे आणि त्यात देश व समाजाच्या ऋणांविषयी बोलणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.