कोकण

राजापूर ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ३ कोटी १७ लाखाचे नुकसान

CD

rat10p11.jpg
O03539
राजापूर ः पावसामुळे तयार भातशेतीतून पडलेल्या दाण्यांना पुन्हा नवे धुमारे फुटले आहेत.

rat10p12.jpg
03540
रत्नागिरी ः दिवाळीनंतर झालेल्या पावसाने भातखाचरात साचलेल्या पाण्यातून अजूनही शेतकरी सावरलेले नाहीत.
(सुधीर विश्वासरावः सकाळ छायाचित्रसेवा)

शेतकऱ्यांचे ३ कोटी १७ लाखाचे नुकसान
१८ हजार ७७८ शेतकरी बाधित; सर्वाधिक भात क्षेत्राला फटका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १०ः ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजार ७७८ शेतकऱ्यांना बसला असून, ३ कोटी १७ लाखाचे नुकसान झाले आहे. ३ हजार ७१६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे कृषी विभागाकडून सुरू असून, १० टक्के काम शिल्लक आहे. पावसात भात भिजून गेल्यामुळे उभी रोपं आडवी झाल्याने आणि त्यावर पाऊस पडल्यामुळे शेतीच्या उत्पादनात १५ टक्क्याने घट होणार आहे. याला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
जिल्ह्यात ५५ हजार ५५१ हेक्टरवर लागवड झाली आहे. ऑक्टोबरमध्ये पडलेल्या पावसामुळे ९५८ गावे बाधित झाली असून, त्यातील १८ हजार ७७८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात भातक्षेत्र ३ हजार ५९२ हेक्टर असून, नाचणी ११२.२ हेक्टर, फळपिके ७.३४ हेक्टर आणि भाजीपाला व अन्य पिकांचे ४.१८ हेक्टर असे मिळून ३ हजार ७१६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. ३ कोटी १७ लाख ३७ हजार रुपयांची भरपाई त्यांना द्यावी लागणार आहे. सर्वाधिक फटका खेड, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यांना बसलेला आहे. सर्वात कमी नुकसान गुहागर तालुक्यात नोंदविले गेले आहे. पंचनाम्यांचे बहुतांश काम पूर्ण झालेले असून, एक हजार शेतकऱ्यांचे पंचनामे शिल्लक आहेत. हा अहवाल आठवड्यात शासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर शासनाकडून मदतीपोटी निधीची तरतूद केली जाईल.
दरम्यान, शासनाच्या निकषानुसार हेक्टरी ८ हजार ५०० रुपये दिले जातात; मात्र ही मदत अत्यंत तुटपूंजी असून, त्याकडे शासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील भातशेती आतबट्ट्याचीच आहे. आधीच गुंठ्यामध्ये भातशेती केली जात असल्याने मोठा फायदा होत नाही; परंतु भात उत्पादनातून वर्षाची बेगमी होत असल्याने गावातील शेतकरी एकमेकांना मदत करून लागवड करत आहे. काही शेतकरी मजुरांच्या मदतीने शेती करतात. त्यांचा खर्च अधिक होतो. त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे. भात उत्पादन हातचे वाया गेले असतानाच सुक्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकरी भात झोडून झाल्यानंतर पेंढा गुरांना चारा म्हणून किंवा आंबापेटी भरण्यासाठी बागायतदारांना विकतात. त्यामधून पैसेही मिळतात; परंतु पावसात भिजलेल्या भाताच्या पेंड्याच शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किरकोळ उत्पन्नावर पाणी फेरावे लागेल.
------------
चौकट १
तालुकानिहाय नुकसानीची आकडेवारी अशी ः

तालुका बाधित क्षेत्र (हेक्टर) शेतकरी संख्या नुकसान (रुपये)
* मंडणगड ३२८.४४ १,५२५ २७ लाख ९२ हजार
* दापोली ४६९.१५ २,३२० ३९ लाख ८८ हजार
* खेड ५९० ३,३६६ ५० लाख १५ हजार
* गुहागर ११९.१९ २,६५० ११ लाख ६१ हजार
* चिपळूण ६३६.९५ २,६५० ५४ लाख १४ हजार
* संगमेश्वर ५३५.७० ३,१२६ ४५ लाख ५३ हजार
* रत्नागिरी ४५० १,८०० ३८ लाख २५ हजार
* लांजा ३८३.४६ २,१७२ ३२ लाख ५९ हजार
* राजापूर २०३.३२ १,१९५ १७ लाख ३ हजार

चौकट
वायंगणी शेतीचा पहिला टप्पा वाया
भातकापणी आटोपल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी वायंगणी (हिवाळी) शेती केली जाते; मात्र पावसाला झालेल्या विलंबाचा या शेतीलाही फटका बसला आहे. कलिंगडसह भाजीपाला शेतीला पावसामुळे उशीर होणार असून, एक हंगाम वाया जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात कापणी झाली की, लगेचच भाजीपाला किंवा कलिंगड लागवडीला सुरवात होते. यंदा विलंब झाल्याने पहिल्या टप्प्यावर पाणी फेरावे लागणार आहे. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे त्यांनी पडलेल्या पावसाचा लाभ घेत रब्बीतील पेरणीही करून घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

Delhi Blast: खोली भाड्याने घेऊन साठवलं होतं बॉम्ब बनवण्याचं साहित्य; काही तासांपूर्वीच ३०० किलो आरडीएक्स जप्त, दिल्ली स्फोटाशी काय कनेक्शन?

Delhi Red Fort blast Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी पोहचले ; जखमींचीही भेट घेणार

Delhi Bomb Blast Fire Officer Video : दिल्ली स्फोटाच्या घटनास्थळी सर्वात पहिल्यांदा पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं

Delhi Blast Update : तीन वेळा जमिनीवर आपटलो, दूरपर्यंत आगीच्या ज्वाळा... दिल्ली स्पोटातील प्रत्यक्षदर्शींने सांगितला हादरवणारा प्रसंग

SCROLL FOR NEXT