कोकण

गर्भलिंगनिदानाविरुद्ध प्रशासनाचे कठोर पाऊल

CD

03581

गर्भलिंगनिदानाविरुद्ध प्रशासनाचे कठोर पाऊल

दक्षता पथकाची बैठक; वैद्यकीय अधीक्षकांना कारवाईच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भधारणा निदान तंत्र (लिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा, १९९४ अंतर्गत जिल्हास्तरीय दक्षता पथकाची बैठक आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यांनी सर्व वैद्यकीय अधीक्षकांना कार्यक्षेत्रातील केंद्रांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश दिले. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, पोलिस उपअधीक्षक श्रीमती खाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील नोंदणीकृत ७५ सोनोग्राफी केंद्रे आणि २६ खासगी गर्भपात केंद्रांच्या तपासणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सर्व वैद्यकीय अधीक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रातील केंद्रांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश दिले. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या. लिंगनिवडीसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी संशयित सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांवर ‘डिकॉय केस’ व स्टिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेशही दिले.
---
...तर तक्रारदाराला लाखाचे बक्षीस
यावेळी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले की, जर कोणतीही व्यक्ती अथवा डॉक्टर गर्भलिंग निदान करत असल्याची माहिती मिळाल्यास, ती शासनाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा संबंधित संकेतस्थळावर तक्रार स्वरूपात कळवावी. तसेच लेखी स्वरूपात तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांच्याकडे संपर्क साधता येईल. शासनाच्या बक्षीस योजनेनुसार अशा तक्रारीमुळे जर गुन्हा नोंदविला गेला, तर तक्रारदारास १ लाखाचे बक्षीस देण्यात येईल.
---
‘पीसीपीएनडीटी’अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा
‘पीसीपीएनडीटी’ कायद्यांतर्गत गर्भलिंगनिदान करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. गर्भलिंगनिदान करणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा व १० हजारांपर्यंत दंड या शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे. तसेच वैद्यकीय गर्भपात कायदा, १९७१ अंतर्गत अहर्ता नसलेल्या डॉक्टरतर्फे तसेच अमान्यताप्राप्त गर्भपात केंद्रामध्ये वैद्यकीय गर्भपात करण्यास परवानगी नाही. कोणतेही मान्यताप्राप्त गर्भपात केंद्र ओळखण्याकरिता केंद्राच्या जागी ‘शासनमान्य वैद्यकीय गर्भपात केंद्र’ याप्रमाणे बोर्ड दर्शविलेला असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT