कोकण

दापोली-भातासह नारळ, सुपारी, भाजीपाल्यालाही फटका

CD

rat10p21.jpg-

दापोली ः मुरूड येथील शेतकरी संजय बाळ यांच्या भातपिकाची पाहणी करताना कृषी अधिकारी दादासाहेब पवार.
---------------
भातासह नारळ, सुपारी,
भाजीपाल्यालाही फटका
दापोली तालुका; शेतकऱ्याचे अर्थकारण विस्कटले
दापोली, ता. १० ः दिवाळीपासून झालेल्या पावसाने दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात भात आणि नाचणीसह नारळ, सुपारी व भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. तब्बल २ हजार २८९ शेतकऱ्यांचे अंदाजे ४१९ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
चालू हंगामात भातशेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने भातपिकाचे सर्वाधिक ३८३ हेक्टर नुकसान झाले आहे याशिवाय नाचणीचे २५ हेक्टर, नारळ-सुपारीचे ८ हेक्टर, भाजीपाला व इतर पिकांचे दीड हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका बसला. या नुकसानीमुळे ग्रामीण अर्थचक्रावर थेट परिणाम झाला असून, शेतकऱ्यांची आर्थिक गणिते विस्कळीत झाली आहेत.
कृषी अधिकारी हेमंत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केले असून, अजूनही शेतकरी कृषी कार्यालयात नोंदणीसाठी येत आहेत. त्यामुळे अंतिम आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाने त्वरित मदत मंजूर करून सहाय्य वितरित करावे, अशी ठाम मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

Cosmetic Treatment Safety: लेसर, बोटॉक्स, हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी सावधान! तज्ज्ञांकडूनच उपचार घेण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : अंधेरी लोखंडवाला परिसरात महिलेचा चैन चोरी करणाऱ्या सराईत साखळी चोराला अवघ्या ५ तासात अटक

Kolhapur Bangalore airport connectivity : देशातील सर्वात मोठा आयटी पार्क असलेल्या शहरासोबत कोल्हापूर विमानसेवा होणार सुरू

Daughter-in-law Legal Duty India : सुनेने सासू-सासऱ्यांची सेवा केली नाही तर गुन्हा दाखल होतो ? हायकोर्टाचा 'हा' महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT