कोकण

-शिवानी मानेंवर वैयक्तिक टीका करू नका

CD

वैयक्तिक टीका कुणीही करू नये
उदय सामंत ः कार्यकर्त्यांना दिल्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : महाविकास आघाडीच्या रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार शिवानी माने यांच्यावर वैयक्तिक टीका कुणीही करू नये, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
महाविकास आघाडीचे तिकीट आपले मित्र आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या कन्येला जाहीर झाले तर आपल्या पक्षाच्या किंवा महायुतीच्या माध्यमातून एकही वाईट शब्द त्यांच्याविरोधात जाता कामा नये, असे उदय सामंत यांनी सांगितले. यातून त्यांनी पुन्हा एकदा राजकीय परिपक्वता आणि संस्कार दाखवून दिले. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराचा नारळ शनिवारी प्रभाग ५ मधून फोडण्यात आला. प्रभाग क्र. ६ मध्येही प्रसारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना सामंत यांनी महायुतीच्या प्रचाराची दिशा स्पष्ट केली.
मंत्री सामंत म्हणाले, आपल्याला विकासाने लोकांची मनं जिंकायची आहेत. कुठेही टीकाटिप्पणी करून, बदनामी करून किंवा वैयक्तिक हल्ले करून मते मिळवायची, असा विचार आम्ही केला नाही. राजकारण करताना समोरच्यावर घाणेरडी टीका केली पाहिजे, असे बंधन आपल्या नेत्यांनी घातलेले नाही. आपण सुसंस्कृत आणि संस्कारी आहोत. काही वर्षांपूर्वी राजेश सावंत आपल्यासोबत काम करत होते ते कॉलेजमध्येही सोबत होते. त्यांच्या घरातली मुलगी म्हणजे आपल्या घरातली मुलगी आहे, असे समजून प्रत्येकाने पुढील २० दिवस स्वतःच्या तोंडाला कुलूप लावून आपण केलेला विकास फक्त लोकांपर्यंत पोहोचवा. दोन-दोन तास लोक थांबतात, हे त्यांचे आपल्यावरील प्रेम आहे. त्यामुळे वैयक्तिक टीकाटीप्पणी करणे, खालच्या दर्जाला जाऊन बोलणे हे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये चालणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

शिवराज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्टांचे वंशज आता काय करतात? त्यांनी जपलेली छ. शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे पाहिलीत का?

Latest Marathi News Live Update : भारतासाठी दिलासा! ४६,५०० टन LPG घेऊन 'नंदा देवी' टँकर गुजरातच्या वदिनार बंदरात दाखल

Share Market Fraud : सावध व्हा! नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली २७ लाखांना चुना; बापलेकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT