कोकण

लोक अदालतीचे गुरुवारी आयोजन

CD

लोक अदालतीचे
गुरुवारी आयोजन
सिंधुदुर्गनगरी ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत गुरुवारी (ता. १३) राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली. ही २०२५ या वर्षातील चौथी लोक अदालत आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयातील तडजोपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमून घेण्याबाबत पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे. तडजोड होऊ शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी १३ डिसेंबरच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवायची असल्यास संबंधित न्यायालयात जाऊन प्रकरण तडजोडीसाठी ठेवायचे आहे, असे संबंधित अधीक्षक अथवा लिपिक आणि संबंधित वकिलांना कळवावे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी केले आहे.
.....................
एकरकमी परतावा
योजनेस मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी ः महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या १४ ऑगस्टच्या परिपत्रकानुसार ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एक रक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के रक्कम सवलत देण्याबाबतची एक रकमी परतावा योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविली आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागास वर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रीती पटेल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग अर्थिक विकास महामंडळ लि. जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत मुदत कर्ज, बीज भांडवल कर्ज, स्वर्णिमा कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना आदी कर्ज योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरिता अल्प व्याजदारने कर्ज वितरित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT