03788
गावराईची जनता सरपंच शिरोडकरांसोबत
पद अबाधित; अविश्वास ठरावाविरोधात २३५ जणांचे मतदान
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः गावराई (ता.कुडाळ) सरपंच यांच्यावर उपसरपंच आणि सदस्यांनी घातलेल्या अविश्वास ठरावात ग्रामस्थांनी सरपंच सोनल शिरोडकर यांना त्यांच्या बाजूने २३५, तर उपसरपंच संतोष सामंत आणि सदस्य यांच्या बाजूने २१० मते दिली. त्यामुळे सरपंच शिरोडकर यांचे पद अबाधित राहिले आहे.
सरपंच शिरोडकर यांच्यावर उपसरपंच संतोष सामंत आणि सदस्यांनी अविश्वास दाखल केला होता. सहा सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वासाची कुडाळ तहसीलदारांनी रितसर बैठक घेतली असता सदस्यांनी केलेला अविश्वास ठराव पारित केला होता. शासनाच्या नव्या शासन निर्णयानुसार सरपंच हे गावातून निवडून दिले जात असतात. त्यामुळे याला ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे. पूर्वी सदस्यांमधूनच सरपंचांची निवड होत असे. त्यानुसार तहसीलदारांनी पारित झालेल्या ठरावानुसार प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी लोकनियुक्त सरपंच असल्यामुळे विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे, अशा सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज सभा निश्चित केली होती. त्यानुसार ग्रामस्थ विरुद्ध ग्रामपंचायत सदस्य यांच्याबाबत कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी तथा निवडणूक अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, संजय ओरोसकर, गजानन धर्णे, महादेव खरात, सोनिया पांजरी आदींच्या उपस्थितीत पोलिसांच्या बंदोबस्तात ग्रामसभा झाली.
गावराई मतदान बूथमधील तीन वार्डाच्या रचनेप्रमाणे झालेल्या मतदानात एकूण ४६७ मतदानांपैकी अविश्वास ठरावाच्या बाजूने २१० व अविश्वास ठरावाच्या विरोधात २३५, तर २२ मते बाद झाली. एकूण ४६७ मतदानामध्ये सरपंच शिरोडकर २५ मतांनी विजयी झाल्या. विजयी उमेदवार आणि ग्रामस्थांचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, विभाग अध्यक्ष परशुराम परब, कसाल सरपंच राजन परब, पावशी सरपंच पल्लवी पावसकर, स्वप्नील गावडे यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.