कोकण

-मंत्र्यांच्या मतदारसंघातच रस्त्यांची दुरवस्था

CD

-rat११p२५.jpg-
२५O०३७८६
दापोली ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार भास्कर जाधव.
-----
मंत्र्यांच्या मतदार संघातच रस्त्यांची दुरवस्था
आमदार भास्कर जाधव; दापोलीत गटनिहाय आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ११ : विकासाची भाषा करणारे आज सर्वत्र दिसतात; पण ज्या मतदार संघाचे नेतृत्व गृहराज्यमंत्री करत आहेत त्या भागातील रस्ते आणि सुविधांची अवस्था आजही बिकट आहे. पैशाने निवडणुका जिंकल्या जातात; पण लोकांची मने मात्र विचारानेच जिंकली जातात, अशा शब्दांत आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दापोली येथे घेण्यात आलेल्या गटनिहाय आढावा बैठकीत ते बोलत होते. दापोलीत आयोजित बैठकीत निवडणूक तयारी, उमेदवारांची निवड, जनसंपर्क मोहीम आणि आघाडीतील समन्वयासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, माजी नगराध्यक्षा ममता मोरे आदी उपस्थित होते.
आमदार जाधव म्हणाले, अनेकांनी विकासाच्या नावाखाली घोषणाबाजी केली. आज मतदारांना खऱ्या विकासाची ओळख पटली आहे. पैसा वापरून मतं विकत घेणे सोपं आहे; पण काम, वागणूक आणि विचार यावर लोकांचा विश्वास टिकतो. आम्ही विकास हा केवळ मंचावर बोलण्यापुरता न ठेवता तो प्रत्यक्षात करून दाखवण्यावर विश्वास ठेवतो. आगामी निवडणूक आघाडीबाबत जाधव म्हणाले, आघाडी निश्चित होईल; मात्र सत्ताधारी युतीमध्ये ताळमेळच नाही. त्यामुळे या तफावतीचा फायदा आघाडीला होणार, हे स्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Highway Crash : मंचर जवळ भाविकांच्या बसला अपघात; नागपूर येथील २२ भाविक जखमी!

सोलापुरातील निवृत्त पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा! भांडण मिटवायला बोलावले होते, पण गैरफायदा घेत विवाहितेलाच शिकार बनविले

Nashik Accident : वणी-सापुतारा मार्गावर धडक; १ ठार, २ जखमी!

Solapur Politics : मंगळवेढ्यात भाजपाकडे नगराध्यक्षसह, नगरसेवकपदासह ६२ जणांचे अर्ज!

Delhi Red Fort Blast: डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन! 'या' तरुणाशी केलं होतं लग्न; लहान भावालाही झाली अटक

SCROLL FOR NEXT