-rat११p२६.jpg-
२५O०३८१०
दापोली ः माजी आमदार सूर्यकांत दळवींच्या घरातून बाहेर पडलेले आमदार भास्कर जाधव.
----
‘जाधव-दळवी’ न झालेल्या भेटीची चर्चा
दापोलीत चुकामूक ; एकेकाळी राजकारणातील खंदे सहकारी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता.११ : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीनिमित्त दापोलीत आलेल्या गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी बैठक संपल्यानंतर आपला मोर्चा थेट भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या निवासस्थानाकडे वळवल्याची माहिती समोर आली; मात्र दळवी हे त्याचवेळी चिपळूण येथील महायुतीच्या बैठकीसाठी रवाना झाल्याने दोघांची प्रत्यक्ष भेट घडू शकली नाही. तरीदेखील या ‘न झालेल्या’ भेटीची चर्चा मात्र दिवसभर शहरात रंगली.
एकेकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात खांद्याला खांदा लावून काम करणारे जाधव व दळवी यांच्यातील स्नेहबंध आजही कायम असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते. दापोली विधानसभा मतदार संघाचे तब्बल २५ वर्षे प्रतिनिधित्व केलेले दळवी हे विधानसभा भवनात सर्वपक्षीय नेत्यांमध्ये सौहार्दाचे संबंध जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. विरोधी बाकांवर असतानाही त्यांना मानाचे स्थान मिळत आले आहे. त्यामुळे दापोलीत येणारे मंत्री, आमदार, खासदार त्यांची भेट घेतात हे पूर्वीपासूनचेच चित्र आहे.
दरम्यान, नर्सरी रोडवरील पेन्शनर्स सभागृहात झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दोन पक्षांना वगळता इतर कुणाशीही चर्चा करू नये, असा सल्ला जाधव यांनी दिला होता; मात्र बैठकीनंतर काही वेळातच त्यांनी स्वतःच थेट दळवी यांच्या निवासस्थानी जाण्याचे ठरवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. दळवी अनुपस्थित असल्याने भेट न घडली तरी ‘ही भेट झाली असती तर?’ यावरच दुपारपासून संध्याकाळपर्यंत शहरात राजकीय चर्चांची खळबळ उडाली.
या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दळवी म्हणाले, अतिथीदेवो भव ही आपली संस्कृती आहे. दापोलीत येणारे विविध पक्षांचे नेते भेटतात. आम्ही दोघेही आमच्या पक्षात सक्रिय आहोत. यात वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.