rat१२p१९.jpg-
०३९५०
राजापूर नगर पालिका
-------------
नगराध्यक्ष, नगरसेवक ठरवणार महिला मतदार
राजापूर पालिका; २० जागांसाठी होणार निवडणूक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ः राजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासह दहा प्रभागातील वीस जागांसाठी ८ हजार १४३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ४ हजार २१९ महिला तर ३ हजार ९२४ पुरुष मतदारांचा समावेश आहे. पुरुष मतदारांच्या तुलनेमध्ये महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने नगराध्यक्षदासह वीस नगरसेवकांचे भवितव्य सावित्रीच्या लेकींच्या हाती राहणार आहे.
पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. त्यामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह दहा प्रभागातील वीस नगरसेवकपदांच्या जागांसाठी लढती होणार आहेत. सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रशासनही निवडणुकीसाठी सज्ज आहे. राजापुरातील मतदारांमध्ये सर्वाधिक म्हणजे १ हजार ६० इतके मतदार हे प्रभाग क्र. ६ मध्ये, सर्वात कमी मतदार प्रभाग क्र. ३ मध्ये ५९६ इतके आहेत. प्रभाग १ मध्ये एकूण ९०० मतदार असून, त्यामध्ये ४३८ पुरुष मतदार तर ४६२ महिला मतदार आहेत. प्रभाग २ मध्ये एकूण ७५५ मतदार असून, ३६२ पुरुष तर ३९३ महिला, प्रभाग ३ मध्ये एकूण ५९६ मतदार असून, २८९ पुरुष तर ३०७ महिला, प्रभाग ४ मध्ये एकूण ७५६ मतदार असून, त्यामध्ये ३६८ पुरुष तर ३८८ महिला, प्रभाग ५ मध्ये एकूण ७५९ मतदारांपैकी ३६७ पुरुष तर ३९२ महिला मतदार, प्रभाग ६ मध्ये एकूण १ हजार ६० मतदार असून, त्यामध्ये ४८६ पुरुष तर ५७४ महिला, प्रभाग ७ मध्ये एकूण ९२६ मतदार असून, ४४३ पुरुष तर ४८३ महिला, प्रभाग ८ मध्ये एकूण ६८३ मतदारांमध्ये ३४५ पुरुष तर ३३८ महिला, प्रभाग ९ मध्ये एकूण ९२३ मतदारांमध्ये ४५२ पुरुष आणि ४७१ महिला, प्रभाग १० मध्ये एकूण ७८५ मतदारांमध्ये ३७४ पुरुष तर ४११ महिला मतदारांचा समावेश आहे.