कोकण

तळकटमध्ये भरवस्तीत बिबट्या

CD

03995
तळकट ः येथील दाजी नांगरे यांच्या अंगणात आलेला बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला.


तळकटमध्ये भरवस्तीत बिबट्या

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १२ : तालुक्यातील तळकट गावात काल (ता.११) रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास बिबट्याने थेट लोकवस्तीमध्ये प्रवेश करत दाजी नांगरे यांच्या घराच्या अंगणात हजेरी लावली. या घटनेचा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या घटनेबाबत ग्रामस्थांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून गावाच्या परिसरात रात्रीच्या वेळी जनावरांचे ओरडणे व पावलांचे आवाज ऐकू येत होते. मात्र, काल रात्रीचा हा प्रसंग प्रत्यक्ष कॅमेऱ्यात कैद झाल्याने भीती अधिक वाढली आहे. बिबट्या काही काळ अंगणात उभा असल्याचे दिसून आले आणि त्यानंतर तो परिसरातून निघून गेला. दररोज सकाळी मुले शाळेसाठी बाहेर पडतात, तर येथे फळबागायती मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना पहाटेपासून शेतीकामासाठी बाहेर जावे लागते. त्यामुळे गावात भीतीचे सावट पसरले असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी बाहेर न जाणे, घरांच्या अंगणात प्रकाश ठेवणे आणि पाळीव जनावरे सुरक्षित स्थळी बांधून ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA PC: महायुती सरकार मूलभूत जनप्रश्नांकडे लक्ष देण्यात अपयशी; विरोधकांनी विचारला जाब, अधिवेशनाआधी राजकारण तापले

Mumbai Water Supply: मॉन्सून कोकणातच खोळंबला! मुंबईवर पाणीटंचाईचे संकट, पाऊस कधी बरसणार? मोठी अपडेट समोर

India Squad: फक्त जैस्वालच नाही, 'या' तीन दिग्गजांचीही इंग्लंड दौऱ्यासाठी निवड नाही; एकाची तर ODI करियर संपल्याचीच चर्चा

मुख्यमंत्र्यांना ७ पट दुषित पाणी दिलं, अधिकाऱ्याला धाडली नोटीस

Latest Marathi News Live Update : RSS चे लोक माझ्यावर हल्ला करतील: अभिजीत दीपके

SCROLL FOR NEXT