swt1315.jpg
04157
सातार्डाः येथील टिळक ग्रंथालयाच्या शतक महोत्सवी सांगता सोहळ्यास उपस्थित मान्यवर.(छायाचित्र ः मदन मुरकर)
सातार्डा ग्रंथालयाचे सेवाकार्य कौतुकास्पद
मंगेश मसकेः सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १३ः सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाने गेली ५० वर्षे ग्रंथालय चळवळीची चांगली सेवा केली आहे. एखादी संस्था ५० वर्षे टिकविणे म्हणजे कठीण काम आहे. हे कठीण काम या ग्रंथालयाने केले आहे. ग्रामीण भागामध्ये ग्रंथालय चळवळ टिकवून ठेवलात हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांनी केले. सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते.
श्री देव महापुरुष मंदिर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मसके, जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष अनंत वैद्य, जिल्हा परिषद माजी महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, पंचायत समिती माजी सदस्या श्रुतिका बागकर, ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उद्योजक दत्ता कवठणकर, सातार्डा सरपंच संदीप प्रभू, कवठणी सरपंच अजित कवठणकर, सातोसे सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, कवठणी माजी सरपंच शेखर गावकर, सातार्डा माजी सरपंच उदय पारिपत्ये, गजानन शिरसाट, मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर, योगेश मांजरेकर, शर्मिला मांजरेकर, सातार्डा पोलिसपाटील विनिता मयेकर, सातोसे पोलिसपाटील संदीप सातार्डेकर, सुदन कवठणकर आदी उपस्थित होते. यावेळी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन भाजप युवा नेते तथा उद्योजक विशाल परब व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी परब यांनी, डिजिटल युगात वाचन संस्कृती टिकवून ठेवणे ही गौरवास्पद बाब आहे, असे सांगितले. रुपेश राऊळ यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रास्ताविकात ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी ग्रंथालयाच्या इतिहासाचा आढावा दिला. मास्टर ऑफ सायन्स फार्मामध्ये सुवर्णपदक प्राप्त नेहा मयेकर, ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त अनंत वैद्य, दहावी परीक्षेत सातार्डा हायस्कूलमधून ९७.२० टक्के गुण मिळवून प्रथम आलेली पालवी नाईक, ग्रंथपाल संजय कवठणकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष सहकार्याबद्दल स्नेहल बागकर यांना सन्मानित करण्यात आले. ग्रंथालयाचे कार्यवाह धनंजय केरकर, सहकार्यवाह ज्ञानदीप राऊळ, सल्लागार नारायण बागकर, मदन मुरकर उपस्थित होते. धनंजय केरकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद मांजरेकर यांनी आभार मानले.