राज्य नाट्य स्पर्धा
(१३ नोव्हेंबर टुडे ३)
rat१३p२.jpg-
P२५O०४११४
रत्नागिरी ः राज्य नाट्यस्पर्धेतील ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ नाटकातील क्षण.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
----
स्वातंत्र्यसैनिकांचा प्रवास
उलगडणारे
‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ः देशात भ्रष्टाचार, बॉम्बस्फोट, खून, राजकीय मतभेद, सामान्य जनता आणि मतदाराची परवड यावर प्रकाश टाकणारे ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ नाटक राज्य नाट्यस्पर्धेत येथील सावरकर नाट्यगृहात झाले. संजय बेलोसे यांच्या उत्तम लेखणीतून उतरलेल्या नाटकाला मंगेश डोंगरे यांनी दिग्दर्शन केले होते. (कै.) संभाजीराव महादेवराव भोसले माजी सैनिक फाउंडेशन संचलित पोफळी येथील ऐशप्रिया आर्ट अॅकॅडमी या संस्थेने हा प्रयोग केला. देशासाठी प्राण पणाला लावून देशसेवा करणाऱ्या आणि निवृत्तीनंतर समाजासाठी झगडणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा जीवनप्रवास उलगडण्यास संस्था यशस्वी झाली. रसिकांना टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
---
काय आहे नाटक?
(कै.) संभाजीराव महादेवराव भोसले माजी सैनिक फाउंडेशन संचलित ऐशप्रिया आर्ट अॅकॅडमी यांनी ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या नाटकाद्वारे निवृत्त स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनातील कटू वास्तवाचे आणि राजकारणातील भ्रष्टाचाराचे गंभीर दर्शन घडवले आहे. ही कथा तीन स्वातंत्र्यसैनिकांच्या भोवती फिरते, ज्यांच्या जीवनात भ्रष्ट राजकीय नेता अशोक चक्रवर्तीने विष कालवले आहे. तीन निष्ठावान सैनिकांचा संघर्ष यामधून मांडण्यात आला आहे. त्यातील केसरी हे जगप्रसिद्ध वैज्ञानिक तर सिंग-हरिचाचा कमांडर दाखवण्यात आले आहेत. दोघेही भ्रष्ट राजकीय नेता अशोक चक्रवर्तीचे बळी ठरतात. राजकारणी केसरींना मनोरुग्ण ठरवतात तर सिंग हरिचाचाचा मुलगा आणि पत्नीचे अपहरण केले जाते. त्याचवेळी केसरी यांना सिंग घरी आणतात. ते आचार्यांच्या घराच्या तळघरात राहत असतात. तळघरात केसरी बॉम्ब बनवण्यासारखे अनेक प्रयोग करत असतो. सिंग-हरिचाचा आणि केसरी यांना अशोक चक्रवर्तीला संपवायचे असते; पण आचार्य अहिंसेच्या मार्गाने जाणार असतात. त्यामुळे या दोघांचे काहीच चालत नाही. निवडणुकीच्या कालावधीत बॉम्बस्फोट होतो त्या वेळी अतिरेकी वेषात एक मुलगा म्हणजेच बाबू झेंडे आचार्यांच्या मानेला पिस्तूल लावून आचार्यांच्या घरातील तळघरात घेऊन येतो. तो जखमी असतो. त्यांच्यावर आचार्यांच्या घरी असलेली डॉक्टर मुलगी भारती उपचार करते. तो व्यवस्थित होतो. निवडणुकीत घडलेल्या बॉम्बस्फोटाचं खापर आचार्यांवर फोडले जाते. न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते. या कालावधीत तंदुरुस्त झालेला बाबू झेंडे भारतीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून तिघेही तिला सोडवतात. भारतीने तुला वाचवलं, ती मातेसमान आहे. तिच्यावरच अत्याचार करतोस, असे सांगत आचार्य त्याला खडसावतात. याचा बाबू झेंडेवर सकारात्मक परिणाम होते. त्याला तळघरातून बाहेर काढले जाते. दोन दिवसानंतर बाबू झेंडे पुन्हा मद्यधुंद अवस्थेत तळघरात येतो. तिघांनाही मला मारून टाका, असे सांगतो. आचार्य पुन्हा त्याला ठेवून घेतात. चारही राजकीय नेते अशोक चक्रवर्तीला मारण्याचा प्लॅन आखतात त्या वेळी माणूस बेशुद्ध होईल, असे पिस्तूल केसरींकडून मिळते. त्यामध्ये झेंडे बेशुद्ध होतो. त्याला केसरी पुन्हा शुद्धीवर आणतात. या वेळी आचार्यांची सुटका करण्यासाठी झेंडे तळघरात फोन नसतानाही केसरींनी तयार केलेल्या फोनवरून बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धमकी देतो. बॉम्बस्फोट प्रकरणातून आचार्यांची सुटका होते तसेच हरिचाचाचा मुलगा व पत्नीला सुखरूप बाहेर काढतो; मात्र अशोक चक्रवर्ती विरुद्ध हरिचाचांनी तयार केलेली फाईल आपल्या ताब्यात घेतो. बाबू झेंडे शांती आणि अहिंसेचा पाईक होतो. आचार्य-मास्तर यांच्याप्रमाणेच समाजसेवा करण्याचे व्रत घेतो आणि निघून जातो. या कालावधीत कार बॉम्बस्फोटात नेता अशोक चक्रवर्ती व चालक बाबू झेंडे यांचा मृत्यू होतो. तळघरात शांतता पसरते. पेपरमध्ये मृत्यू झालेल्या बाबू झेंडेचा फोटो नसतो. त्यामुळे केसरी, आचार्य आणि भारतीला हायसे वाटते. तेवढ्यातच बाबू झेंड म्हणजेच आधार अशोक चक्रवर्ती आचार्यांच्या वेशात समोर दाखल होतो. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. शेवटी आधार चक्रवर्ती वडिलांच्या जागी निवडणूक लढवतो. जाताना आचार्यांकडे त्यांची गांधी टोपी मागतो. अशी नाटकाची कथा.
---
सूत्रधार आणि साहाय्य
संगीत ः नीलेश मुळे, प्रकाशयोजना ःउदय पोटे, रंगभूषा-वेशभूषा ः दीपेश घाणेकर, नेपथ्य ः उदय भोसले, दिलीप जाधव, विनोद कदम, संजय सुतार, प्रमोद बोडरे. रंगमंच व्यवस्था ः संजय गोळपकर, रामा भगत, सुनील विचारे, संतोष डोंगरे, विनायक सुतार.
----
* पात्र परिचय
केसरी ः मंगेश डोंगरे. बाबू झेंडे ः विक्रांत जिरंगे. मास्तर-आचार्य ः राजेंद्र जाधव. सिंग-हरिचाचा ः साताप्पा राणे. भारती ः अर्चना यादव.
----
आजचे नाटक
नाटक ः दी व्हॉईस ऑफ टॉलरन्स. सादरकर्ते ः खरडेवाडी क्रीडा मंडळ, मुंबई-मेर्वी-रत्नागिरी. स्थळ ः स्वा. सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर. वेळ ः सायंकाळी ७ वाजता.