04207
वेंगुर्लेत आघाडीबाबत शेवटपर्यंत चर्चा करू
विनायक राऊत : नगराध्यक्षपदासाठी निकम
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १४ : येथे आघाडीबाबत कोणतीही प्रगती अद्याप झाली नाही. मात्र, आम्ही आशावादी आहोत. निवडणुकीची अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आल्याने आम्ही नगराध्यक्षांसह इतर उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आघाडीबाबत चर्चा सुरू राहील, असे माजी खासदार तथा ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांची निवड केली असून आमच्याकडे एक नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवकपदाचे उमेदवार तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. येथील सुंदर भाटले येथे ठाकरे शिवसेनेच्या कार्यालयात श्री. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेत्या जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रेया परब, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत ऊर्फ बाळू परब, शहरप्रमुख शैलेश परुळेकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी नगरसेवक तुषार सापळे, उभादांडा सरपंच नीलेश चमणकर, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, माजी शहरप्रमुख अजित राऊळ उपस्थित होते.
श्री. राऊत म्हणाले, ‘येथील पालिका निवडणूक आघाडीमार्फत लढविली जावी, यासाठी ठाकरे शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत. निवडणुकीसंदर्भातील तयारीचा आढावा घेतला आहे. आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढविल्या जाव्यात, अशी आजही इच्छा आहे. सावंतवाडीमध्ये आघाडीबाबत बऱ्यापैकी प्रगती झाली आहे. मात्र, दुर्दैवाने वेंगुर्लेत आघाडीबाबत कोणतीही प्रगती झाली नाही.’
-----------------
भ्रष्टाचार उघडकीस आणू
वेंगुर्लेत मागच्या पाच वर्षात मार्केट, मच्छीमार्केट, वॉटर एटीएम आदी विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला. तो उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही. अन्यायाविरोधात आम्ही लढू आणि वेंगुर्लेचे देदीप्यमान नाव आहे ते पुन्हा उदयास आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. वेंगुर्लेतील वैभव पुन्हा एकदा टिकवून ठेवायचे असेल तर ‘आम्ही वेंगुर्लेकर, आमचे वेंगुर्ले, आम्ही वेंगुर्ल्यासाठी'' हे घोषवाक्य घेऊन आम्ही वेंगुर्ल्यामध्ये काम करणार आहोत, असेही श्री. राऊत यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.