कृष्णाजी कुलकर्णी
यांचे व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १४ : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाभर व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. गोवा येथील नामवंत साहित्यिक प्राध्यापक कृष्णाजी शामराव कुलकर्णी यांचे दापोली येथे ''संत साहित्याचा सामाजिक अन्वयार्थ'' या विषयावर व्याख्यान होणार आहे.
व्याख्यान मालेचे उद्घाटन १४ नोव्हेंबर रोजी होणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, चिपळूण, देवरुख, पाली, नाणीज, लांजा आणि राजापूर येथे ही व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. दापोलीत या कार्यक्रमाचे आयोजन दापोली तालुका ग्रंथालय संघ आणि ह. के. गोखले वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रम जलस्वराज्य जालगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात दुपारी ३ वाजता पार पडणार असून प्रा. कुलकर्णी ''संत साहित्याचा सामाजिक अन्वयार्थ'' या विषयावर व्याख्यान देतील. याप्रसंगी मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व वाचनालय कर्मचारी, संचालक, विद्यार्थी व अभ्यासकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, समन्वयक राकेश आंबेरकर, दापोली तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रविंद्र कालेकर आणि मधुरा जोशी (अध्यक्षा, ह. के. गोखले वाचनालय) यांनी केले आहे.