rat14p4.jpg-
04299
दापोली ः विज्ञान प्रदर्शनातील विविध विषयांच्या मॉडेल्सची संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकवृंदांनी पाहाणी केली.
ए. जी. हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात
विज्ञान, भूगोल, हस्तकलांचे प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १४ः दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए. जी. हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विज्ञान, पुष्परचना, रांगोळी, हस्तकला आणि भूगोल या विभागांचे प्रदर्शन आयोजित केले असून त्याचे उद्घाटन संस्थेचे सचिव विनोद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनात पर्यावरण संरक्षण, सौर ऊर्जा आणि जलसंवर्धन या विषयांवरील मॉडेल्स मांडण्यात आली होती. भूगोल प्रदर्शनात भारताचा भूगोल, हवामान बदल, ज्वालामुखी आणि चांद्रयान मोहीम या विषयांवरील माहितीपूर्ण सादरीकरण झाले. पुष्परचना विभागात विद्यार्थ्यांनी नैसर्गिक फुलांपासून सुंदर नमुने साकारले. रांगोळी प्रदर्शनात पारंपरिक आणि आधुनिक रांगोळ्यांद्वारे स्वच्छ भारत, बेटी बचाओ, निसर्ग संवर्धन यासारखे सामाजिक संदेश देण्यात आले. हस्तकला विभागात विविध कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन करून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवले.
या कार्यक्रमाला श्रीराम माजलेकर, रवींद्र कालेकर, श्रीकांत निजामपूरकर, स्मिता सुर्वे, प्रकाश रेळकर, शरद कांबळे, अर्जुन घुले, ए. एस. पेठकर, मगदूम एस. आय., मोहिते पी. इ., दाबके आर. व्ही., शिर्के एस. एस., अनिल शेठ, आर. आर. टोपरे आदी उपस्थित होते.