कोकण

रत्नागिरी-मराठी टिकली नाही, तर महाराष्ट्राची ओळख पुसेल

CD

...तर महाराष्ट्राची ओळख पुसेल
डॉ. दीपक पवार; मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या प्रश्नावर राज्य दौरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : महाराष्ट्रात हिंदी या तिसऱ्या भाषेच्या सक्तीला ९० टक्के लोकांचा विरोध आहे, हे नरेंद्र जाधव समितीच्या दौऱ्यातूनही स्पष्ट झाले आहे. या विरोधामागे केवळ भाषिक कारणे नसून, शिक्षण, रोजगार आणि राज्याच्या अस्मितेशी जोडलेले व्यापक प्रश्न आहेत. ​मराठी भाषा मरू नये यासाठी साहित्यिकांसह सर्वांनी प्रयत्न करायला हवे; परंतु तसे दिसत नाही. साहित्यिकांनी शरणागती पत्करली आहे. मराठी भाषा टिकली नाही तर महाराष्ट्राची ओळख टिकणार नाही, असे परखड मत मुंबई विद्यापिठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि मराठी अभ्यासकेंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या प्रश्नावर ते राज्यात दौरा करत आहेत. या वेळी रत्नागिरीतील हॉटेल विवेक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. पवार म्हणाले, ​पहिली भाषा कधी शिकवावी, दुसरी कधी आणि तिसरी कशी याचे शिक्षणशास्त्र आणि भाषाशास्त्रानुसार काही नियम आहेत. सध्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी शिकवले जाते; पण यामुळे विद्यार्थ्यांचे मराठी किंवा इंग्रजी किती सुधारले/बिघडले याचे योग्य ऑडिट झालेले नाही. तिसरी भाषा लहान वयात सक्तीची केल्यास भाषिक गोंधळ वाढू शकतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पहिल्या किंवा अंतिम आराखड्यात कुठेही दुसऱ्या भाषेच्या सक्तीचा स्पष्ट उल्लेख नाही. राज्य शैक्षणिक आराखड्यात काही अधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे हा उल्लेख आला, जो चुकीचा आहे.
सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सध्या इंग्रजी आणि हिंदी शिकवले जाते आणि मराठीला तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवावे लागते. याच धर्तीवर एसएससी बोर्डातही हिंदीची सक्ती करून समानीकरण साधण्याचा प्रयत्न होत आहे.​ याला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे समानीकरण करायचेच असेल तर उत्तर भारतात जर सीबीएसईची शाळा हिंदी माध्यमाची असू शकते तर महाराष्ट्रात ती मराठी माध्यमाची का असू शकत नाही ?​ सीबीएसई शाळांमध्ये हिंदी काढून फक्त मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा शिकवाव्यात आणि हिंदी पाचवीनंतर पर्यायी ठेवावी.

कोट
सर्व राजकीय पक्षांनी (शिवसेना, मनसे, काँग्रेस) एकत्र येऊन मराठी भाषेसाठी ठोस कृती करणे आवश्यक आहे. त्यांच्या एकत्र येण्यापेक्षा मराठी माणूस टिकतोय का हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील सर्व जातीधर्माच्या मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
- डॉ. दीपक पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Kagal MIDC Accident : दुबईहून सुट्टीला आलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT