कोकण

यलो झोन असूनही विकासाला ब्रेक

CD

04404
कणकवली ः शहरातील प्रभाग १ मध्ये नियोजित रिंगरोडचे काम अपूर्ण स्थितीत आहे.

लीड
कणकवलीत १७ प्रभागांतील १७ नगरसेवक पदांसह नगराध्यक्ष पदासाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. यामुळे पक्षांची चढाओढ चुरशीची बनली असून शहरातील राजकीय तापमान चढू लागले आहे. १७ ही प्रभागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात समस्या कायम आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय समस्यांचा आढावा घेणारी मालिका आजपासून सुरू करत आहोत.
--------

यलो झोन असूनही विकासाला ब्रेक

कणकवली प्रभाग एकची स्थिती; रिंगरोडसह अनेक प्रश्न अजूनही जैसे थे

राजेश सरकारे ः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १४ : शहरातील ग्रामीण भाग म्‍हणून ओळख असलेल्‍या निम्मेवाडी, मधलीवाडी, करंबेळकरवाडी, सुतारवाडी आणि पिळणकरवाडीचा भाग प्रभाग १ मध्ये समाविष्ट झाला आहे. पाच या प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्‍न काही प्रमाणात मार्गी लागला. मात्र, या प्रभागातून जाणारा रिंगरोड अपूर्ण राहिला आहे. या प्रभागात मच्छीमार्केट उभे राहिले. परंतु, मच्छीमार्केटमध्ये चिकन आणि मटण विक्रेत्‍यांना एकाच छताखाली आणण्याचे प्रयत्‍न फोल ठरले.
शहरात सर्वाधिक यलो झोन प्रभाग एकमध्ये आहे. मात्र, मुख्य रस्त्यांना जोडणारे अंतर्गत रस्त्यांचे जाळे अद्याप पूर्णत्‍वास गेलेले नाही. त्‍यामुळे यलो झोन असूनही या प्रभागातील विकासाच्या गतीला ब्रेक लागला आहे. मागील पाच वर्षांत अंतर्गत रस्त्यांचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्‍न सत्ताधाऱ्यांनी केला. यात बांधकरवाडीतील शाळा क्रमांक २ येथून राणे नगरी ते मधलीवाडी, सुतारवाडी पर्यंतचा रस्ता पूर्ण करण्यात आला. तसेच रवळनाथ मंदिर ते कामत वसाहतपर्यंतही रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. निम्मेवाडीमध्येही अंतर्गत घरांसाठी रस्ता तयार करण्यात आला. मात्र, या प्रभागातील बांधकरवाडी ते निम्मेवाडी, निम्मेवाडी ते वरचीवाडी, पिळणकरवाडी ते निम्मेवाडी स्वयंभू मंदिर आदी अंतर्गत रस्त्यांचे जाळे होणे आवश्‍यक आहे. हे रस्ते पुढील पाच वर्षात पूर्णत्‍वास गेले तर शहराचा अविकसित झालेला हा भाग विकासाच्याबाबतीत गतिमान होणार आहे.
येथील नगरपंचायतीची मुदत मे २०२३ मध्ये संपली. त्‍यानंतर गेली दोन वर्षे नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट होती. त्‍यामुळे या प्रभागातील रिंगरोड प्रश्‍न जैसे थे राहिला. मात्र, गेल्‍याच महिन्यात या प्रभागातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी एक कोटीची तरतूद झालीय. त्‍यामुळे पुढील दोन वर्षात रिंगरोडचा या प्रभागातील टप्पा पूर्ण होण्याची प्रतीक्षा इथल्‍या नागरिकांना आहे. या प्रभागात शहरातील मच्छीमार्केट आहे. या मच्छीमार्केटमध्ये शहरातील सर्व चिकन आणि मटण विक्रेत्‍यांना एकत्रित व्यवसाय करता यावा यासाठी गाळ्यांची उभारणी करण्यात आली. मात्र, राजकीय विरोध आणि मत्स्यखाते आणि नगरपंचायत प्रशासनामधील तांत्रिक अडचणींमुळे चिकन, मटण विक्रेत्‍यांचे स्थलांतर रखडले आहे.
शहरात भुयारी गटार योजना नाही. तसेच अंतर्गत गटार व्यवस्था देखील सक्षम नाही. सध्या अंतर्गत डांबरी रस्ते झालेल्‍या मधलीवाडी, सुतारवाडी नव्याने निवासी संकुले उभी राहत आहेत. मात्र सांडपाणी निचरा व्यवस्थेचा मोठा प्रश्‍न आहे.
कणकवलीचे ग्रामदैवत श्रीस्वयंभू रवळनाथ, फलाहारी महाराज आश्रम, श्रीराममंदिर प्रभाग एक मध्ये येते. मात्र, या मंदिरापर्यंत येण्याचा रस्ता खड्डेमय आहे. हा रस्ता जिल्‍हा परिषदेच्या ताब्‍यात आहे. त्‍यामुळे नगरपंचायत निधी खर्च करू शकत नाही अशीही समस्या आहे. नगरपंचायतीच्या आराखड्यात ‘हाऊस फॉर डिसहाऊस’ हे आरक्षण देखील याच प्रभागात आहे. ज्‍यांना घरे नाहीत, त्‍यांना या प्रभागात प्रशासनाने या आरक्षणांतर्गत घरे बांधून द्यावयाची आहेत. मात्र, निधी अभावी हे आरक्षण विकसित झालेले नाही.
या प्रभागात आजही ऊस शेती केली जाते. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भातशेती होते.
------
‘जानवली’त बंधारे आवश्‍यक
बारमाही शेती बागायती होण्यासाठी जानवली नदीपात्रात बंधारे उभारण्याची गरज आहे. परंतु, त्‍याबाबत कोणतीही योजना नगरपंचायतीकडे नाही. राज्‍य शासनाने जानवली नदी पुनरूज्‍जीवनचा आराखडा तयार केला होता. मात्र, तो अद्यापही कार्यान्वित झालेला नाही. ठिकाणी पाणी व्यवस्था झाली असती तर बारमाही शेती व बागायती झाली असती. त्‍यातून स्थानिकांना उत्पन्नाची मोठी संधी होती. पण, याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
-------------
प्रभाग : - १ (लोकसंख्या ८९८, आरक्षण : सर्वसाधारण)
स्थळ : निम्मेवाडी, मधलीवाडी, करंबेळकरवाडी, सुतारवाडी, पिळणकरवाडी.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ATS: जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स; अल-कायदासाठी काम, न्यायालयीन कोठडीत झाली रवानगी

PM Modi big Statement on Congress : बिहारमधील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसचा मोठा गट फुटणार? ; मोदींच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

Bihar Election Result 2025 Live Updates : वैशाली जिल्ह्यातील कोणत्या जागेवर कोणी विजय मिळवला?, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघात प्रकरणी कंटेनर मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

Latest Live Update News Marathi: नवले पुलाजवळ तीन वर्षांत अपघातांमध्ये २७ जणांचा बळी

SCROLL FOR NEXT