कोकण

चिपळूण-सह्याद्रीला पुन्हा सक्षम व्याघ्र अधिवास बनविणार

CD

rat14p16.jpg
04399
चिपळूण ः सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबा तारा वाघिणीचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
---------
सह्याद्रीला पुन्हा सक्षम व्याघ्र अधिवास बनवणार
तुषार चव्हाण ; तारा वाघीण प्रकल्पात दाखल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ : ऑपरेशन तारा हा सह्याद्रीसाठी ऐतिहासिक पुढचा टप्पा आहे. या वाघिणीच्या सॉफ्ट रिलीजमुळे सह्याद्रीतील वैज्ञानिक पुनर्स्थापना कार्यक्रमाला सुरवात झाली आहे. आमच्या पथकाने ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत जबाबदारीने व सुरळीतरित्या पार पाडली. डब्ल्यूआयआयच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यपूर्ण निरीक्षण करून सह्याद्रीला पुन्हा सक्षम व्याघ्र अधिवास बनवू, असा विश्वास सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले.
वनविभागाने ऑपरेशन तारा या व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील तरुण वाघिणीचे यशस्वीरित्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण केले आहे. ही कार्यवारी भारतीय वन्यजीव संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. सुमारे ३ वर्षांची ही वाघीण एनटीसीएच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वानुसार ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून सुरक्षितरित्या पकडण्यात आली आहे. तिला योग्य पशुवैद्यकीय उपचार देऊन सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाकडे समर्पित वन्यजीव वाहतुकीच्या वाहनातून स्थलांतरित करण्यात आले. सध्या तिला सोनारली येथील एनक्लोजरमध्ये सॉफ्ट रिलीज पद्धतीने सोडण्यात आले असून, पुढील टप्प्यात वनात सोडण्यापूर्वी तिचे निरीक्षण करण्यात येणार आहे.
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण म्हणाले, बुधवारी (ता. १२) दुपारी ४ वा. वाघीण पकडण्याची मोहीम ताडोबा येथे चालू झाली. वाघीण ५ वा. पकडून पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आली. कागदपत्रे, वैद्यकीय सर्व तपासण्या, फिटनेस पाहून रात्री १० वाजता कराडच्या दिशेने प्रवास सुरू झाला. मध्यरात्री दीड वाजता वाघीण घेऊन चांदोली येथे वनविभागाची टीम दाखल झाली. पुन्हा एखाद्या वैद्यकीय तपासण्या, फिटनेस पाहून पहाटे ३.२० ला वाघीण एनक्लोजरमध्ये सॉफ्ट रिलीज करण्यात आले. या चंदा वाघिणीस सह्याद्री व्याघ्रप्रकल्पामधील नवीन नाव ''तारा'' असे देण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान वाघिणीची प्रकृती चांगली राखण्यासाठी ताडोबा व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर येथील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे यांनी नेतृत्व केले. हे यशस्वी स्थानांतरण महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. ताडोबा व सह्याद्री येथील पथकांनी केलेल्या समन्वित, वैज्ञानिक आणि जबाबदार कार्यामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला आहे.

चौकट
आठ वाघांचे होणार स्थानांतरण
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प व पेंच व्याघ्रप्रकल्प येथील तीन नर व पाच मादी अशा एकूण आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्रप्रकल्प येथे स्थानांतरण करण्यास मंजुरी दिली आहे. त्यातील एका वाघिणीचे सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात आगमन झाले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया काटेकोर सुरक्षा मानदंड पाळून व सततच्या निरीक्षणाखाली पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ATS: जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स; अल-कायदासाठी काम, न्यायालयीन कोठडीत झाली रवानगी

PM Modi big Statement on Congress : बिहारमधील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसचा मोठा गट फुटणार? ; मोदींच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

Bihar Election Result 2025 Updates : बिहारमध्ये एनडीएने डबल सेंच्युरी ठोकली, महाआघाडीचा पराभव, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघात प्रकरणी कंटेनर मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

Latest Update News Marathi: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT