कोकण

भाजपतर्फे नगराध्यक्ष पदासाठी श्रद्धाराजे भोसले यांचा अर्ज

CD

04424

भाजपतर्फे नगराध्यक्ष पदासाठी
श्रद्धाराजे भोसले यांचा अर्ज

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः येथील पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या श्रद्धाराजे भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष लखम सावंत भोसले उपस्थित होते. ‘ऑनलाइन’ प्रक्रियेमुळे नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी आज हा अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.
येथील पालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण हळूहळू तापत असतानाच आज कोणतीही कल्पना न देता भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी जवळपास निश्चित झालेल्या सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत-भोसले यांनी कोणताही गाजावाजा न करता कुटुंबीयांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज लक्षात घेता सावंतवाडी राजघराण्यातील पालिकेच्या, किंबहुना शहरातील राजकारणामध्ये ही पहिलीच ‘एंट्री’ ठरली आहे. एकही भाजप पदाधिकारी नसताना त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाळगलेल्या कमालीच्या गुप्ततेमागील नेमके कारण समजू शकले नसले, तरी ‘ऑनलाइन’ प्रक्रियेमुळे त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जिरगे यांनी हा अर्ज स्वीकारला.
दरम्यान, युतीसंदर्भात काहीच निर्णय झाला नसताना शिंदे शिवसेना आणि भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यात शिंदे शिवसेनेकडून उद्या (ता. १५) नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. भाजपकडूनही उद्या किंवा सोमवारी (ता. १७) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. आतापर्यंत नगरसेवक पदासाठी दहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात ठाकरे शिवसेनेच्या आठ, तर अपक्ष दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ATS: जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स; अल-कायदासाठी काम, न्यायालयीन कोठडीत झाली रवानगी

PM Modi big Statement on Congress : बिहारमधील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसचा मोठा गट फुटणार? ; मोदींच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

Bihar Election Result 2025 Updates : बिहारमध्ये एनडीएने डबल सेंच्युरी ठोकली, महाआघाडीचा पराभव, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघात प्रकरणी कंटेनर मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

Latest Update News Marathi: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT