कोकण

राजापूर - जागतिक हवामान बदल परिषदेत राजापुरचा सुपुत्र

CD

rat14p17.jpg-
04420
राजापूर ः भारत सरकारच्या शिष्टमंडळाममधून ब्राझिल येथे होत असलेल्या जागतिक हवामानबदल परिषदेमध्ये सहभागी झालेले संतोष गांगण.
----------
जागतिक हवामान बदल परिषदेत राजापुरचा सुपुत्र
भाजप नेते संतोष गांगण यांचा सहभाग; कोकणातील एकमेव कार्यकर्ते
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ः संयुक्त राष्ट्रसंघाच्या ब्राझिलमध्ये होत असलेल्या जागतिक हवामान बदल परिषद (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज) होत आहे. ब्राझिल येथे होत असलेल्या या परिषदेमध्ये केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या भारत सरकारच्या शिष्टमंडळामध्ये राजापूरचे सुपूत्र आणि भाजपचे नेते संतोष गांगण सहभागी झाले आहेत.
हवामानामध्ये होत असलेले विविध बदल आणि या बदलांचा सामना करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर प्रामुख्याने विचारविनिमय केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी या परिषदेमध्ये सहभागी झाले असून, संसदेत किंवा विधिमंडळाचे प्रतिनिधी नसतानासुद्धा संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत भारत सरकारच्यावतीने सहभागी होणारे संतोष गांगण हे कोकणातील एकमेव सामाजिक कार्यकर्ते आहेत.
या परिषदेमध्ये हवामान बदलाचा सामना कसा करायचा, ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करणे, हवामानातील बदलांना अनुकूल धोरणे स्वीकारणे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक मदतीची व्यवस्था करणे यांसारख्या विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात येते. यापूर्वी झालेल्या हवामान बदल परिषदेत सहभागी झालेल्या भारत सरकारच्या शिष्टमंडळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतृत्व केले आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयअंतर्गत दिशा समितीचे सदस्य आहेत.
भारतीय संस्कृती पर्यावरणचा आदर करणारी असून, त्याचा आदर्श विश्वातील प्रत्येक देशाने घेतल्यास हवामान बदलाच्या समस्येवर तोडगा मिळण्यास निश्चित मदत होईल असा विश्‍वास गांगण यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ला; भारतीयांच्या मृत्यूने तणाव वाढला, केंद्र सरकारचा इशारा

Nagpur Bench Verdict : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांनाही समान हक्क; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

SCROLL FOR NEXT