०४७६३
rat१६p२४.jgp - राजापूर नगरपालिका इमारत
--------
फ्लॅश बॅक - लोगो
इंट्रो
ब्रिटिशांच्या काळातील व्यापारउदीम, विविध सुधारणा आदीत अग्रेसर असलेल्या राजापूर शहरात नगरपालिकेची स्थापना १८७६ ला झाली आहे. ज्यांच्या काळात या नगरपालिकेची स्थापना झाली त्या ब्रिटिशांच्या येथील वास्तव्याच्या खाणाखुणा सांगणार्या स्मृती कागदोपत्री उपलब्ध आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली स्थापना झालेल्या आणि अर्जुना-कोदवली नदीच्या संगमावर वसलेल्या राजापूर शहराचा प्रशासकीय कारभार पाहणार्या राजापूर नगरपालिकेची गेल्या सुमारे १४९ वर्षातील वाटचाल मनोरंजक आणि लक्षवेधी आहे...!
- राजेंद्र बाईत, राजापूर
---------
‘नोटिफाईड एरिया कमिटी’ची झाली ‘म्युनिसिपालिटी’
प्रांतिक कारभारात भारतीय लोकांना बरेचसे अधिकार प्राप्त झाले होते. त्यानंतर, १९४० मध्ये राजापुरात तत्कालीन मामलेदार मुर्तुझा यांच्या अध्यक्षतेखाली चार प्रतिष्ठित लोकांची नोटिफाईड कमिटी स्थापन झाली. नोटिफाईड कमिटीच्या स्थापनेनंतर सहा महिन्यानंतर राजापूर शहरात लोकनियुक्त प्रतिनिधींची कमिटी अस्तित्वात आली. लोकनियुक्त कमिटीच्या सभासदांमध्ये डॉ. बाबासाहेब कुळकर्णी, डॉ. सरखोत, कारखानीस वकील, महंमदसाहेब ठाकूर, खलिफे, पित्रे वकील, रावसाहेब मोंडकर आदींचा समावेश होता. डॉ. कुळकर्णी यांच्या पत्नी ताई कुळकर्णी या नियुक्त सभासद होत्या. त्यानंतर, राजापूरचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान डॉ. वि. स. सरखोत यांना मिळाला. त्यांच्या कमिटीचा कार्यकाळ दोन वर्ष सहा महिने (१९४०-४१ ते २७ एप्रिल,१९४३) या कालावधीसाठी राहिला. यानंतर नन्हेसाहेब अहंमदसाहेब पुढल्या काळात नगराध्यक्ष झाले.
१९४० मध्ये शहराची लोकसंख्या सुमारे सहा हजार होती. त्या वेळी शहराचे भटाळी, बाजारपेठ, वरचीपेठ आणि गुजराळी असे चार वॉर्ड होते. १९४५ नंतर ‘नोटिफाईड एरिया कमिटी’चे नामकरण ‘म्युनिसिपालिटी’ असे झाले. बाजारपेठेतील शेट्ये यांच्या जागेत म्युनिसिपालिटीचे कार्यालय होते. नगर पालिकेच्या सध्याच्या इमारतीमध्ये हे कार्यालय तत्कालीन नगराध्यक्ष यशवंत धोंडिबा चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये २९ एप्रिल, १९७९ मध्ये स्थलांतरित झाले. त्या वेळी मुख्याधिकारी म्हणून श्रीकृष्ण बेलवलकर काम पाहत होते. या स्थलांतर सोहळ्याचे माजी नगराध्यक्ष गजानन कुशे, उस्मानशेठ चौगुले, प्रभाकर इंदुलकर आदींसह अनेकजण साक्षीदार होते. नव्या इमारतीच्या उभारणीचा खर्च साधारण ५२ हजार ७०० रुपये अपेक्षित होता; मात्र, ६० हजार रुपये आला. या इमारतीचे बांधकाम २६ मार्च, १९७९ ला पूर्ण झाले.
स्थापनेनंतर आजपर्यंत राजापूर शहराचे नगराध्यक्षपद २७ जणांनी भूषविले असून त्यामध्ये सात महिलांचा समावेश आहे. नगराध्यक्षपद भूषवल्यानंतर पुढे आमदार (विधान परिषद सदस्य) होणार्या हुस्नबानू खलिफे या एकमेव आहेत. राजापूर पालिकेच्या इतिहासामध्ये २७ डिसेंबर, १९८० ते १४ मे, १९८५ आणि २८.१२.२०२१ ते आजतागायत अशी केवळ दोनदाच प्रशासकीय कारकीर्द राहिली.
----------
चौकट १
स्थापना वर्ष ः १८७६
क्षेत्रफळ ः ६.१९ चौ.कि.मी.
-------
चौकट २
आजपर्यंतचे नगराध्यक्ष
डॉ. विनायक सरखोत, नन्हेसाहेब अहमद साहेब, यशवंत चव्हाण, शांताराम मालपेकर, शांताराम नार्वेकर, परशुराम कोळेकर, लक्ष्मण लेले, इब्राहिम काझी, गजानन कुशे, प्रभाकर इंदुलकर, उस्मानशेठ चौगुले, रमाकांत मालपेकर, जयप्रकाश नार्वेकर, जावेद ठाकूर, मधुकर देवरूखकर, आनंद पाटणकर, म्हामुद मुल्ला, वैशाली मांजरेकर, हुस्नबानू खलिफे, सुरेश कोळेकर, कल्याणी रहाटे, अपूर्वा मराठे, स्नेहा कुवेसकर, मुमताज काझी, जमीर खलिफे, मीना मालपेकर, हनिफ काझी.
चौकट
१८७८ सालचे सायबाचे धरण
ब्रिटिशांनी राजापूरात केलेल्या काही लक्षवेधी सुधारणांमध्ये तत्कालीन इंग्रज कलेक्टर क्राँफर्ड यांनी १८७८ म्हणजे तब्बल १४७ वर्षापूर्वी कोदवली येथे सायबाचे धरण बांधले. या धरणावरून विजेशिवाय अखंडीतपणे होणारा पाणीपुरवठा शहरवासियांची आजही तहान भागवत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.