कोकण

रत्नागिरी- घेतली तंबाखू मुक्त युवाची शपथ

CD

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी
घेतली तंबाखू मुक्त युवाची शपथ
रत्नागिरी, ता. १६ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम रत्नागिरी विभागाच्यावतीने तंबाखूमुक्त युवा शपथ घेण्यात आली. एनटीपीसी समुपदेशक प्राची भोसले यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागृती निर्माण करणे आणि आरोग्यदायी, व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश देणे हे होते. एन.एस. एस विभागाचे माजी विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस रसाळ याने सर्वांना शपथ दिली. विद्यार्थी आणि कर्मचारी या सर्वांनी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर न करण्याची आणि समाजात तंबाखूमुक्त वातावरण निर्मितीची शपथ घेतली. तंबाखूमुक्त भारत - निरोगी भारत या घोषवाक्याने कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला. या वेळी एन.एस.एस. विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे, एनटीपीसी समुपदेशक प्राची भोसले, सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे, जिल्हा मानसिक आरोग्य कर्मचारी श्वेता मांजरेकर आणि एन.एस.एस स्वयंसेवक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT