कोकण

चिपळूण-महायुती-महाआघाडीत अजूनही संभ्रमच

CD

महायुती-महाआघाडीची
गटबाजीच्या धोक्याने सावधानता
नेत्यांच्या विरोधी भूमिका; आज वेगवान घडामोडी
चिपळूण, ता. १६ : नगरपालिका निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीतही सुरु असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र अजूनही नगराध्यक्षपदाचा गुंता सुटलेला नाही. उद्धव सेनेतील एक गट कॉंग्रेस सोबत जाण्यास अनुकूल आहे,
तर दुसरा गट आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. हीच परिस्थिती महायुतीत निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेत्यांच्या या विरोधी भुमिकांमुळे पक्षांतर्गत गटबाजीचा धोका वाढू लागला आहे.
चिपळूण पालिकेसाठी महायुती व महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. दोन्ही बाजूने अद्याप अधिकृत अशी कोणतीच घोषणा झालेली नाही. परंतु प्रत्येक पक्षांनी आपले उमेदवार तयार ठेवले आहेत. आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (ता. १७) वेगवान घडामोडी घडणार आहेत.
या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई,जिल्हाध्यक्ष सोननलक्ष्मी घाग, राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार रमेश कदम यांच्यासह तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी थेट आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयात पोहचले. तिथे महाविकास आघाडी संदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाली.
या बैठकीतील चर्चेचा पूर्ण तपशील उपलब्ध झाला नसला तरी चर्चा सकारात्मक झाल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
माजी आमदार रमेश कदम यांनी अर्ज दाखल केला आहे. याचबरोबर उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक पदाचे काही उमेदवार देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु काँग्रेसची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र माजी खासदार हुसेन दलवाई आघाडीसाठी सकारात्मक असल्याने काँग्रेसही आघाडीत सहभागी होण्याची श्यक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT