-rat१८p१३.jpg-
२५O०५१३३
राजापूर ः बिबट्याचा वावर शोधण्यासाठी शहरामध्ये बसवलेला ट्रॅप कॅमेरा.
----
राजापुरातील बिबट्याला पकडण्याची तयारी
वनविभागाचा पुढाकार : पिंजरा बसवण्यासाठी हालचाली
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः शहरातील लोकवस्तीमध्ये गेल्या काही वर्षापासून बिबट्याचा सातत्याने संचार सुरू आहे. या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये कैद करण्याच्यादृष्टीने वनविभाग आता अॅक्शनमोडमध्ये आला असून, त्याला वनविभागाने दुजोरा दिला आहे.
गेल्या काही वर्षापासून शहरातील लोकवस्तीमध्ये बिबट्याचा बिनधास्तपणे वावर असल्याचे बोलले जात आहे. दोन वर्षापूर्वी बिबट्याने पोलिसलाईन परिसरातील कोदवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिला दुचाकीस्वारावर हल्ला केल्याची घटना घडली होती. एवढेच नव्हे तर, शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पोलिस ठाण्यात घुसून बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. सायंकाळच्यावेळी बिबट्या बिनधास्तपणे फिरत असल्याचे ग्रामस्थांच्या नजरेसही पडले आहे. त्यामुळे मनामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरवासियांकडून सातत्याने केली जात आहे.
सुमारे दहा महिन्यांपूर्वी बिबट्याला पकडण्यासाठी शहरामध्ये वनविभागातर्फे पिंजरा बसवण्यात आला होता; मात्र, त्यामध्ये बिबट्या सापडलेला नाही. त्याचवेळी बिबट्याचा संचार शहरामध्ये कोणकोणत्या भागामध्ये आणि कशा पद्धतीने होत आहे, हे नेमके समजण्यासाठी वनविभागाने दोन ट्रॅपकॅमेरेही बसवले होते; मात्र, त्यामध्येही बिबट्या ट्रॅप झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी शहरातील समर्थनगर-भटाळी परिसरामध्ये रात्रीच्यावेळी फिरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग अॅक्शनमोडमध्ये आले आहे. त्यामध्ये समर्थनगर-भटाळी परिसरामध्ये पिंजरा बसवण्याची कार्यवाही हाती घेतल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
कोट ः
राजापूर शहरातील समर्थनगर भटाळी भागामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेजमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता बिबट्याला पिंजऱ्यामध्ये कैद करण्यासाठी समर्थनगर-भटाळी भागामध्ये वनविभागामध्ये पिंजरा बसवण्याची कार्यवाही सुरू आहे. गस्तही घालण्यात येत आहे. रात्रीच्यावेळी फिरताना नागरिकांनी योग्य ती सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारी बाळगावी.
---जयराम बावदाने, वनपाल, राजापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.