राज्य टेनिस क्रिकेट
संघात अंकुर हुमरे
चिपळूण : तालुक्यातील नारदखेरकी बौद्धवाडी येथील अंकुर हुमरे याची उत्तरप्रदेश मथुरा येथे होणाऱ्या ९व्या टेनिस क्रिकेट नॅशनल चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट संघात निवड झाली आहे. चिपळूण तालुका आणि त्याच्या गावासाठी ही अभिमानाची बाब आहे. अंकुरला लहानपणापासूनच खेळाची आवड आहे. त्याने शालेय स्पर्धांमध्येही उत्तम कामगिरी केली होती. एका सामान्य कुटुंबातील मुलाने परिश्रमाने घेतलेली ही यशाची भरारी निश्चितच अभिमानास्पद आहे. नारदखेरकी गावच्या सन्मानात अंकुरच्या निवडीमुळे भर पडली आहे. उत्तरप्रदेश मथुरा येथे होणाऱ्या ९व्या टेनिस क्रिकेट नॅशनल चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट संघात त्याची निवड झाली आहे.
सावर्डेत आज
निसर्गचित्रण स्पर्धा
चिपळूण ः प्रा. डॉ. वासंती जोशी स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्मृतिगंध’ या उपक्रमांतर्गत सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट आणि कल्पवृक्ष आर्ट गॅलरी– ग्वालियर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. १९ ) जिल्हास्तरीय निसर्गचित्रण (प्रत्यक्ष निसर्गचित्रण) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सावर्डे व परिसरात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार शेखर निकम, ज्येष्ठ चित्रकार प्रा. प्रकाश राजेशिर्के, सह्याद्री शिक्षणसंस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, कल्पवृक्ष आर्ट गॅलरी ग्वालियर, मध्यप्रदेशचे संचालक प्रमोद जोशी, कोल्हापूरचे चित्रकार शिवाजी मस्के, कोल्हापूर चित्रकार प्रशांत जाधव उपस्थित असतील. स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील कला विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. स्पर्धेची वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १.३० अशी असेल. यामध्ये विद्यार्थ्यांना जेवण तसेच संध्याकाळी चहा-पाणीव्यवस्था करण्यात येणार आहे. या स्पर्धेत काढलेली चित्रांचे प्रदर्शन सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या कलादालनात सायंकाळी ४.३० वा. लावण्यात येईल. तिथेच बक्षीस वितरण होईल.
बाळासाहेब ठाकरे
पुण्यस्मरण दिन
चिपळूण : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण तालुका जनसंपर्क कार्यालय येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. बाळासाहेबांच्या ठाम नेतृत्वाची, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी घेतलेल्या जिद्दीच्या लढ्याची व त्यांच्या संस्कारांची आठवण काढत सर्वांनी त्यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला क्षेत्रप्रमुख महादेव कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, तालुका संघटक राजू देवळेकर, शहरप्रमुख सचिन कदम, महिला उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.