कोकण

साहित्याशी जवळीक साधल्यास ज्ञानविश्व विस्तारते

CD

-ratchl१८१.jpg-
२५O०५१७०
चिपळूण ः डीबीजे येथे व्याख्यान देताना प्रा. प्रा. कृष्णाजी कुलकर्णी.
----
मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे
कृष्णाजी कुलकर्णी ः डीबीजे महाविद्यालयात व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने इतर भाषा सहज आत्मसात होतात तसेच भाषेच्या माध्यमातून साहित्याशी जवळीक साधल्यास ज्ञानविश्व विस्तारते, असे गोवा येथील साहित्यिक प्रा. कृष्णाजी शामराव कुलकर्णी यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प डीबीजे महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये झाले. त्यांनी साहित्य आणि समाजजीवन या विषयावर मार्गदर्शन केले.
चिपळूण ग्रंथालय संघाचे समन्वयक रमेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एम. एस. बापट यांनी व्याख्याते कुलकर्णी यांचे स्वागत करून व्याख्यानमालेसाठी रत्नागिरी ग्रंथालय संघाचे आभार मानले. व्याख्याते कुलकर्णी यांचा परिचय डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे संचालक प्रदीप पवार यांनी करून दिला. साहित्य आणि समाजजीवन या विषयी बोलताना कुलकर्णी यांनी कविता, संस्कृत श्लोक आणि सोपी उदाहरणे यांच्या माध्यमातून विषय उजळून सांगितला. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एम. मोरे, डॉ. सी. सी. आठवले तसेच प्राध्यापक, वाचनालय संचालक जठार आणि ग्रंथपालही उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

Nashik Municipal Corporation : नाशिककरांनो सावधान! महापालिकेच्या सर्वेक्षणात दीड लाखांहून अधिक नळजोडण्या आढळल्या नियमबाह्य

Jim Corbett: जिम कॉर्बेटचा हाऊसफुल्ल! बुकिंग उघडताच काही मिनिटांत ४१ खोल्या बुक; करावी लागतेय वर्षभर प्रतीक्षा!

Ratnagiri Farmer : जिल्ह्यात सकाळी धुके, दुपारी उन्हाचा कडाका; विचित्र; वातावरण, कमाल तापमान ३८ अंशांवर, बागायतदार चिंतेत

SCROLL FOR NEXT