कोकण

रत्नागिरी- अॅड. भिडे यांची दोन लाखांची देणगी

CD

rat19p13.jpg-
05395
रत्नागिरी : बार असोसिएशनतर्फे मुकुंद भिडे यांचा सत्कार करताना विलास पाटणे. सोबत प्रदीप नेने, अशोक कदम.
------------
बार असोसिएशन, कर्मचारी युनियनला
भिडे यांचेकडून दोन लाखांची देणगी
रत्नागिरी, ता. २० : येथील ज्येष्ठ अॅड. मुकुंद भिडे यांनी रत्नागिरी बार असोसिएशन आणि कर्मचारी युनियन यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची देणगी दिली. वकिली व्यवसायाला पन्नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल भिडे यांचा सत्कार बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष विलास पाटणे यांनी केला.
याप्रसंगी पाटणे म्हणाले की, भिडे यांनी वकिली करताना आदर्श उभा केला. अत्यंत पारदर्शी व्यवहार आणि पक्षकारांच्या हिताला त्यांनी सर्वोच्च स्थान दिले. पक्षकारांना शुल्काची पावती देणारे ते पहिले वकील.
सत्काराला उत्तर देताना भिडे म्हणाले प्रथमतः मी ग्रंथालयात पुस्तकांची व्यवस्थित वर्गवारी करून देवघेवसंदर्भात शिस्त लावली. न्यायालय परिसरात बेलाची वगैरे झाडे लावून परिसर हिरवागार करण्याचा प्रयत्न केला. आपण न्यायालय परिसरात सर्वांनी एकतरी झाड लावण्याची गरज आहे. दिवाणी कामात आपण अभ्यास केला, तर आपल्याला निश्चित यश मिळते, असा माझा अनुभव आहे. सूत्रसंचालन रत्नदीप चाचले यांनी केले.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रदीप नेने, अशोक कदम, संकेत घाग, अवधूत कळंबटे, शाल्मली आंबुलकर, सिद्धार्थ बेंडके, सरोज भाटकर, प्रफुल्ल साळवी, निनाद शिंदे, शम्मी पडवेकर, दिलीप धारिया, सचिन रेमणे, श्रेयस मलुष्टे, मच्छिंद्र आंब्रे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

Harish Rana Euthanasia: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालं होतं? इच्छामरण म्हणजे काय? भारतात कायदा काय सांगतो अन् कोणते देश मान्यता देतात?

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

SCROLL FOR NEXT