कोकण

जिल्ह्यातील संस्थांना सर्वतोपरी सहकार्य

CD

०५४६५

जिल्ह्यातील संस्थांना सर्वतोपरी सहकार्य

मनीष दळवी ः मठ सोसायटीत सहकार मेळाव्याचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ ः सहकारी चळवळ, सहकार संस्था या पवित्र क्षेत्रामध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचारी काम करीत आहोत. प्रत्येकाने प्रामाणिकपणे पारदर्शकपणे काम करुन आपली संस्था नावारुपाला कशी येईल? यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या संस्थांना जिल्हा बँकेचे सर्वतोपरी सहकार्य लाभेल. प्रत्येकाने मिळालेल्या या संधीचा सदुपयोग केला पाहिजे. तसेच सहकारी संस्थातील पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सहकार सप्ताहनिमित्त आयोजित मेळाव्यात केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ म. सिंधुदुर्गतर्फे जिल्ह्यात शुक्रवार (ता.१४) पासून सहकारी सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्त वेंगुर्ले तालुक्यातील श्री. स्वयंमेश्वर वि.का.स सेवा संस्था, लि., मठ मध्ये आज सहकार सप्ताहनिमित्त सहकार मेळावा झाला. याचे अध्यक्ष श्री. दळवी होते. सहकार अधिकारी वेंगुर्ला आर.टी. चौगुले यांनी उद्‍घाटन केले. जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष गजानन सावंत, संचालक एम. के. गावडे, वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी, भोगवे गावचे माजी सरपंच महेश सामंत, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक रमण वायंगणकर उपस्थित होते.
माजी सरपंच महेश सामंत यांनी कोकणातील निसर्गाचा पुरेपुर वापर करून कृषी पर्यटनावर सहकाराच्या माध्यमावर चालना द्यावी, असे सुचित केले. तर एम. के. गावडे यांनी सहकार वाढीसाठी करावयाचे प्रयत्न यासाठी मार्गदर्शन केले. सहकार बोर्डाचे विकास अधिकारी मंगेश पांचाळ यांनी प्रास्ताविक केले. श्री. स्वयंमेश्वर संस्थेचे अध्यक्ष सुभाष बोवलेकर यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. या मेळाव्याला वेंगुर्ले तालुक्यातील सर्व विकास संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सभासद व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेचे वेंगुर्ला तालुका विकास अधिकारी व सहकारी उपस्थित होते.
---
उद्योग व्यवसाय सुरू करा!
चौगुले यांनी तरुण वर्गाने सहकारी संस्थांमध्ये समाविष्ठ होत बेकारी कमी करण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजेत. ग्रामीण कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करावी. पारंपरिक शेती व्यतिरीक्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादने वाढवावीत. सर्वांनी संघटित होत सहकाराच्या माध्यमातून आपला व गावाचा सर्वांगिण विकास साधावा, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT