swt204.jpg
05611
कुडाळः ‘विज्ञानरथम’चे नवीनकुमार यांचा सत्कार करताना डॉ. सायली प्रभू, सानिका मदने, ऋतुजा परब, विपिन वराडे व इतर मान्यवर. (छायाचित्र ः अजय सावंत)
‘विज्ञानरथम’ अंतर्गत कुडाळात
शिक्षक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २०ः कुडाळ इनरव्हील क्लब, इनरव्हिल डिस्ट्रिक्ट ३१७ व रोटरी क्लब ऑफ विरुधनगर तामिळनाडू यांच्यावतीने आयोजित विज्ञानरथम उपक्रमांतर्गत येथील कुडाळ हायस्कूलमधील ९०० विद्यार्थांना व २५ शिक्षकांना विज्ञान विषयक विविध प्रयोगांसह विज्ञान विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी इनरव्हील क्लब अध्यक्षा सानिका मदने, माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. सायली प्रभू, ऋतुजा परब, स्वप्नाली साळगावकर, रोटरी क्लब ऑफ विरूधम तामिळनाडूचे समन्वयक नवीनकुमार, कुडाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक बिपिन वराडे, उपमुख्याध्यापक प्रवीण भोगटे, पर्यवेक्षक रंजन तेली, उपस्थित होते.
इनरव्हीलच्या विज्ञानरथम बसने आतापर्यंत ३८८३ किलोमीटरचा प्रवास करत ७८ दिवसांत १३४ शाळांमधील ४३,८७५ विद्यार्थी व १७६२ शिक्षकांना विज्ञान विषयक जनजागृतीपर माहितीचा लाभ दिला आहे. यावेळी अध्यक्ष सानिका मदने यांनी, उत्कर्षा पाटील, रोटरी क्लब ऑफ विरूधनगर तामिळनाडू, रोटरी डिस्ट्रिक्ट ३२१२ मधील इधयम ट्रस्ट यांचे योगदान बहुमोल असल्याने कुडाळ हायस्कूलमधील पाचवी ते नववीपर्यंतच्या ९०० विद्यार्थी व २५ शिक्षकांना मोफत लाभ देता आला, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.