काही सुखद----------लोगो
- rat२०p१८.jpg-
२५O०५६२५
सावर्डे : कुंभारखाणी बुद्रुक ग्रामदेवता मंदिर पदाधिकाऱ्यांकडून निराधारांना साहित्य वाटप करताना.
----
कुंभारखाणी बुद्रुक मंदिर संस्थेचा निराधारांना आधार
मालघर येथील संस्था ; वृद्ध, दिव्यांगांना अन्नधान्य, वस्त्रासह पूजासाहित्य भेट
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २० : मानवतेची ऊब, आपुलकीची कास आणि देवत्वाचा स्पर्श यांचे सुंदर मिश्रण कुंभारखाणी बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथील ग्रामदेवता मंदिर संस्थेच्या सामाजिक उपक्रमामुळे दिसून आला. समाजातील वंचित घटकांना आधार देत अनेक वर्षे कार्यरत असलेल्या मालघर ( ता. चिपळूण) येथील आरती निराधार सेवा फाउंडेशन संस्थेतील निराधार, वृद्ध, दिव्यांग बंधू-भगिनींना साडीसह दैनंदिन वापरासाठी साखर, चहापत्ती, लाडू, चिवडा असे वाटप करण्यात आले. पूजासाहित्य, अन्नधान्य, वस्त्र आणि आवश्यक वस्तू मंदिर संस्थेकडून देण्यात आले.
आरती नारकर यांच्या संकल्पनेतून मालघर येथे उभारलेल्या आरती निराधार सेवा फाउंडेशन गुरुकुल हायस्कूल कुंभारवाडी या सेवा फाउंडेशनला साठे कुटुंबीयाने आपली इमारत दिली आहे. येथील श्रावणी मानके व कर्मचारी यांचा सेवाभाव हृदयाला भिडणारा आहे. या केंद्रात ४० निराधार असून, त्यांच्या सेवार्थ १२हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. बासरीवादन, ढोलवादन, गायन, टाळ्या वाजवून या निराधारांनी वातावरण चैतन्यमन बनवले आहे. या निराधार सेवाकेंद्रातून हाताला काम देऊन उद्योगकेंद्राची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. मंदिर समितीचे पदाधिकारी विकास सुर्वे, संजय साळवी, संजय सुर्वे, आशिष सुर्वे, राजश्री कदम, शलाका सुर्वे, शीतल साळवी यांच्या उपस्थितीत निराधार केंद्रातील लोकांना आधार देण्यात आला. साहित्य मिळाल्यानंतर निराधार संस्थेतील ज्येष्ठ महिला आणि बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंदाचे भाव पाहून उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे पाणी तरळले होते. याबाबत विकास सुर्वे म्हणाले, ग्रामदेवतेकडून मिळालेलं हे पुण्यकार्य फक्त धार्मिक परंपरेपुरते मर्यादित न राहता समाजातील दुर्बल घटकांच्या पुनर्वसनासाठी उपयोगात येत आहे, हीच खरी देवपूजा आहे. दातृत्वधारी हातांनी आपली पावले येथे वळवून या केंद्राला सहकार्य करायला हवे. हा संस्कार या केंद्राने आम्हा सर्वांना दिला आहे.
---
कोट
मंदिर पदाधिकाऱ्यांचा हा उपक्रम गावच्या सर्वांगीण विकासात मोलाचा ठरत असून, धर्मस्थळ आणि समाजसेवा यांची जोड या संकल्पनेला अधोरेखित करणारा आहे. ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण झालेली देणगी माणुसकीची सेवा या स्वरूपात निराधारांच्या हातात पोहोचावी, या सुंदर भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
- आशिष सुर्वे, पदाधिकारी, ग्रामदेवता मंदिर संस्था कुंभारखाणी बुद्रुक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.