कोकण

एकसंध भारतासाठी रत्नागिरीत एकता पदयात्रेला प्रतिसाद

CD

- rat२०p९.jpg-
२५O०५५८०
रत्नागिरी : जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आयोजित एकता पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील.
- rat२०p१०.jpg-
२५O०५५७४
रत्नागिरी : एकता पदयात्रेत सहभागी विद्यार्थी.
----
एकसंध भारतासाठी रत्नागिरीत एकता पदयात्रा
जिल्हा प्रशासन ; १६ शाळांतील विद्यार्थी सहभागी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त शहरात १६ शाळा, महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थ्यांनी एकता पदयात्रा आणि विकसित भारतयात्रा उत्साहाने काढली. पदयात्रेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल येथून सुरुवात करण्यात आली. जिल्हा प्रशासन, माय भारत केंद्र, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले.
क्रीडासंकुल ते जयस्तंभमार्गे, मारुती मंदिर या मार्गावरून ही पदयात्रा काढण्यात आली. पुन्हा स्टेडियम येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे स्मरण करून एकता पदयात्रेचे उद्दिष्ट सांगितले. राष्ट्रीय एकतेच्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या एकता पदयात्रेचे आयोजन केले आहे. यातून तरुणांमध्ये राष्ट्रीय अभिमान, सामाजिक जबाबदारी आणि एकतेची भावना निर्माण होईल. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकसंध भारताच्या विचारांना स्मरून एकात्म भारताच्या निर्मितीचा संकल्प या माध्यमातून केला आहे. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम, जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. युवा कल्याण अधिकारी अमित पुंडे यांनी प्रास्ताविक केले.
----
चौकट १
या शाळांनी घेतला सहभाग
शहरातील वैद्यकीय महाविद्यालय, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, दामले विद्यालय, देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालय, नवनिर्माण शिक्षणसंस्था, जिल्हा विधी प्राधिकरण, रा. भा. शिर्के प्रशाला, सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, ए. डी. नाईक हायस्कूल, नाईक स्कूल, अ. के. देसाई हायस्कूल, मिस्त्री हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, गोदुताई जांभेकर विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उद्यमनगर कॉन्व्हेन्ट हायस्कूलचे विद्यार्थी एनएसएस तसेच एनसीसी कॅडेट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai : "मी बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..."; निवृत्तीपूर्वी बीआर गवई काय म्हणाले? बाबासाहेबांचे मानले आभार, सर्वजण स्तब्ध!

जिला कधी अपमानित केलं… तीच ठरली जगाची राणी! मेक्सिकोची फातिमा बॉश मिस यूनिव्हर्स विजेती; भारताची मनिका ‘या’ क्रमांकावर

Google Name Facts: गुगलच्या नावात आहेत तब्बल 10 “O”! जाणून घ्या यामागचा खरा अर्थ

MP Nilesh Lanke: गड, किल्ल्यांसाठी विशेष निधी द्यावा: खासदार नीलेश लंके; महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, संवर्धन गरजेचं..

Australian Open Badminton 2025: लक्ष्य, आयुष उपांत्यपूर्व फेरीत; ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन, सात्त्विक-चिराग जोडीचीही वाटचाल

SCROLL FOR NEXT