कोकण

सागरी सुरक्षा रक्षकांचे वेतनाविना हाल

CD

सागरी सुरक्षारक्षकांचे वेतनाविना हाल
रत्नागिरी, सिंधुदुर्गत ११० रक्षक; मत्स्य विभागाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी , ता. २०ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ११० सागरी सुरक्षारक्षकांचा वेतनाचा गंभीर प्रश्न पुढे आला आहे. सागरी सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या या रक्षकांचे गेल्या ४ महिन्यांपासून वेतन रखडल्याने त्याच्यासह कुटुंबीयांचे आर्थिक हाल सुरू झाले आहेत.
सागरी सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या सुरक्षारक्षकांचा पगार गेल्या चार महिन्यांपासून शासनाकडून देण्यात आलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल ७० तर शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ४० अशा एकूण ११० सुरक्षारक्षकांचे वेतन जमा होत नसल्याकारणाने हे सुरक्षारक्षक मेटाकुटीस आले आहेत. यंदा दिवाळी सणालादेखील वेतन जमा झाले नव्हते; मात्र सुरक्षारक्षकांची दिवाळी शासनाकडून मिळालेल्या बोनसवर साजरी झाली. राज्यशासनामध्ये सध्या कोकणाला दोन कॅबिनेट खाती मिळाली आहेत, मत्स्योद्योग खाते तर सिंधुदुर्गतील आमदार नीतेश राणे यांच्याकडे आहे तरी देखील ही परिस्थिती ओढावत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोकण किनारपट्टी संवेदनशील मानली जाते. तसेच अवैध मासेमारी व किनारपट्टीवरील संशयास्पद गोष्टींवर नजर ठेवण्याची जबाबदारी या सुरक्षारक्षकांची आहे. ऊन, वारा, थंडी, पाऊस यांची पर्वा न करता हे सुरक्षारक्षक आपली जबाबदारी पार पाडत असतात; मात्र गेले चार महिने थकीत वेतनाअभावी या कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. याबाबत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांशी संपर्क साधण्यात आला; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: 'त्या' गोष्टीमुळे नैराश्य, तरूणीची खाडीत उडी, धक्कादायक कारण समोर; Video Viral

काही तासांपूर्वी शेअर केली रील, मेसेजला रिप्लायही दिला; राहत्या घरी मिळाला प्रसिद्ध रीलस्टारचा मृतदेह

Latest Marathi News Live Update : नाशिक-नगरच्या कांद्याला मॉरिशसची बाजारपेठ; १ लाख टन निर्यातीची घोषणा

एका चुकीमुळे सुंदरा फेम अभिनेत्रीने गमावलेले सगळे प्रोजेक्ट्स ; "मी दिवसभर अनेक स्टुडिओ पालथे घातले"

Hingoli Car Accident: कळमनुरी जवळा पांचाळमध्ये थार कारच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT