कोकण

सरकारनामासाठी

CD

फ्लॅशबॅक------------लोगो

चिपळूणची १४८ वर्षातील वाटचाल--------भाग ४

नव्या पालिकेसमोर
विकासाची मोठी परीक्षा

चिपळूण पालिकेची निवडणूक झाल्यानंतर पालिकेला नवीन कारभारी मिळतील ते पुढील अनेक आव्हानांना तोंड कसे देणार आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. रस्ते, पाणी, वीज, पूरनियंत्रण, क्रीडांगणे, कचराप्रकल्प, गाळ उपसा अशी अनेक मूलभूत कामे करण्याची संधी नव्या नगरसेवकांसमोर असणार आहे.

----मुझफ्फर खान, चिपळूण

---
चिपळूण शहरासाठी १६६ कोटी रुपयांची कोळकेवाडी धरणातून थेट चिपळूण शहराला पाणीपुरवठा करणारी ग्रॅव्हिटी योजना सुरू आहे. ही योजना पूर्ण करून शहराला २४ तास पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नव्या नगरसेवकांवर असणार आहे. शहराला सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे पाईप जागोजागी फुटतात. त्यामुळे पाणी योजनेला गळती लागते. ती गळती काढून मुरणारे पाणी शोधावे लागणार आहे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आता सुरू झाले आहे, नारायण तलाव सुधारित झाला आहे. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरूजी उद्यान, पाग जोशी उद्यान तयार झाले आहे, ते सर्व राखले पाहिजे. शहरात वृक्ष लागवड होत आहे, त्यांचे संवर्धन झाले पाहिजे. उक्ताड मैदान, पवन तलाव (पी. के. सावंत क्रीडांगण), गोवळकोट मैदान तयार होत आहे. अशा प्रकारचे अन्य भागातही क्रीडांगणे विकसित झाली पाहिजेत. रामतीर्थ तलाव, पेठमाप तलाव संवर्धन करणे, छोटी छोटी उद्याने, बालोद्याने विकसित झाली पाहिजेत. घनकचरा खत प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. आता नदी प्रदूषित होणार नाही यासाठी टाऊन प्लॅनिंग व डेव्हलपमेंट प्लॅनमधील विविध कामे अधिक गतीने व दर्जेदार होणे गरजेचे आहे. शहरात शासनाकडून वर्षानुवर्ष अनेक जमिनीवर आरक्षण आखून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी त्रासले आहेत. जोपर्यंत त्या जमिनीवर विकास करणे अशक्य आहे तोपर्यंत मूल्याप्रमाणे दरवर्षी जमीनमालकांना अनुदान देणे आवश्यक आहे तसेच टीडीआर गोंडस शब्दापेक्षा त्यांना भरपाई मिळणे आवश्यक ठरणार आहे. कारण, पूरपरिस्थितीमुळे नवीन बांधकाम करण्यास परवानगी नाही. त्यामुळे असे शब्द काय कामाचे? संबंधित जमीनमालकांना मोबदला पैशाच्याच स्वरूपात दिला पाहिजे अन्यथा त्याच्या जागा परत द्याव्यात. १९०५, १९०९, २००५ आणि २०२१ मधील महापुरांमुळे चिपळुणात पूर आला. यापुढे नागरिकांनी सजग राहिले पाहिजे. २००३ मध्ये रस्त्यांवरच्या बकाल कचराकुंड्या रद्द करून घंटागाड्या सुरू केल्या आहेत. त्यामध्ये अजूनही सुधारणा करताना ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे.
----
चौकट
अनेक आव्हाने
मागील सभागृहाकडून भुयारी गटारांचे सर्वेक्षण केले गेले. त्याचे पुढे काय झाले? ते नव्या कारभाऱ्यांना शोधावे लागेल. सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. शहरातील अतिक्रमणावर मार्ग काढावा लागेल. रस्त्यांची दुरुस्ती वार्षिक तत्त्वावर न करता एकदाच चांगले सुस्थितीत रस्ते करावे लागतील. शहरातील आरक्षित जागांचा विकास करावा लागेल. भाजीमंडईचा प्रश्न सोडवावा लागेल. रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना फेरीवाला झोन तयार करून त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी लागेल, अशी अनेक मूलभूत कामे करण्याची संधी नव्या नगरसेवकांसमोर असणार आहे

(समाप्त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai : "मी बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..."; निवृत्तीपूर्वी बीआर गवई काय म्हणाले? बाबासाहेबांचे मानले आभार, सर्वजण स्तब्ध!

जिला कधी अपमानित केलं… तीच ठरली जगाची राणी! मेक्सिकोची फातिमा बॉश मिस यूनिव्हर्स विजेती; भारताची मनिका ‘या’ क्रमांकावर

Google Name Facts: गुगलच्या नावात आहेत तब्बल 10 “O”! जाणून घ्या यामागचा खरा अर्थ

MP Nilesh Lanke: गड, किल्ल्यांसाठी विशेष निधी द्यावा: खासदार नीलेश लंके; महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, संवर्धन गरजेचं..

Australian Open Badminton 2025: लक्ष्य, आयुष उपांत्यपूर्व फेरीत; ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन, सात्त्विक-चिराग जोडीचीही वाटचाल

SCROLL FOR NEXT