कोकण

युती, आघाडीकडून भेटी-गाठीवर भर

CD

रत्नागिरीत युती, आघाडीच्या भेटीगाठी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर रत्नागिरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रचाराला वेग आला आहे. उमेदवार जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे रत्नागिरीत महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्ये धाकधूक होती. शहरात १५ प्रभाग असून, अपक्षांमुळे तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यातच उमेदवारांनी भेटीगाठींवर भर दिलेला आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतरही शांतता असलेल्या रत्नागिरी शहरातील निवडणुकीचे रण तापू लागले आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीत महायुतीने सर्व ताकद पणाला लावली आहे. रत्नागिरीतील महायुतीच्या प्रचाराचा नारळ प्रभाग ५ मधून फुटला. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवीस्टॉप येथे प्रचाराची कॉर्नर बैठक झाली. या प्रभागात पूर्णतः नवीन चेहरे महायुतीकडून रिंगणात उतरवण्यात आले आहेत. नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलेल्या शिल्पा सुर्वे यांचे होमपिच असून, तिथे सौरभ मलुष्टे, पूजा पवार हे नशीब आजमावणार आहेत. या प्रभागात सुर्वे या मताधिक्य मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित करू शकतात. रत्नागिरीत शिंदे शिवसेना २६ तर भाजप सहा जागांवर लढत आहे तसेच महाविकास आघाडीमध्ये २६ जागा ठाकरे शिवसेना, चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), एक काँग्रेस आणि एक जागा बसप लढवणार आहे.
महायुतीत भाजपमधील तिघांनी शिंदे शिवसेनेच्या चिन्हावर उभे राहाणे पसंत केले आहे. सध्या प्रचारासाठी कालावधी कमी असल्यामुळे घरोघरी गाठीभेटी यावरच सर्वांनी भर दिला आहे. प्रत्येक प्रभागातील उमेदवार प्रचाराचा श्रीगणेशा करताना धार्मिक पद्धतीचा अवलंब करत आहेत. युती व आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी येथील नवलाई देवीच्या मंदिरात नारळ अर्पण करून प्रचाराला प्रारंभ केला आहे. पक्षाचे नेते, पदाधिकारी नागरिकांशी संवाद साधत असून, प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासह विकासकामे पूर्ण करण्यावर आम्ही कसा भर देणार, याबाबत संवाद साधत आहेत. महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या शिवानी माने-सावंत यांनीही घरोघरी गाठीभेटींवरच भर दिलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iran-israel conflict: होर्मुझमध्ये ७०० तेल टँकर अडकले! जगात तेल संकटाची भीती; भारताकडे किती दिवसांचा साठा?

Team India Schedule: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचे वेळापत्रक; अफगाणिस्ताननंतर कोणकोणत्या संघाला भिडणार, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या आनंदनगर उड्डाण पुलावर अपघात

Rashmika & Vijay : रश्मिका–विजयचा विवाहसोहळ्यानंतर गावात पूजाअर्चा, देशभर अन्नदान

Iran Israel War: युद्धाच्या छायेत युपीचे ६ हजार कामगार सुरक्षित! योगी सरकारची मोठी घोषणा; मदतीसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

SCROLL FOR NEXT