rat20p20.jpg
05643
रत्नागिरी : जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या विजयदुर्ग किल्ल्याला भेटीप्रसंगी गोगटे महाविद्यालयातील इतिहास विभागाचे विद्यार्थी.
----------
विजयदुर्ग, कनकादित्य मंदिराला
गोगटे महाविद्यालयाची क्षेत्रभेट
रत्नागिरी, ता. २२ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या विजयदुर्ग किल्ल्याला तसेच कशेळी येथील कनकादित्य (सूर्य) मंदिर या सांस्कृतिक वारशाने समृद्ध स्थळांना विद्यार्थ्यांनी भेट दिली.
पीएम उषा उपक्रमांतर्गत महाविद्यालयात भूतकाळाचा शोध घेणे: ऐतिहासिक स्मारके आणि पुरातत्त्व स्थळांचा शोध घेणे, कौशल्यवर्धित अभ्यासक्रम सुरू आहे त्या अंतर्गत ही भेट आयोजित केली. बीए आणि एमए इतिहास विषयाच्या ३१ विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक शिक्षकांनी भेट दिली. क्षेत्रभेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्थळावर जाऊन किल्ल्यांची रचना, संरक्षण प्रणाली, सागरी मार्गावरील रणनीती तसेच प्राचीन मंदिरांच्या स्थापत्य वैशिष्ट्यांचा व सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा होता.
या क्षेत्रभेटीदरम्यान पाऊलखुणा पर्यटन उपक्रम चालवणारे श्रीवल्लभ साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विजयदुर्ग किल्ल्याचे सामरिक महत्त्व, शिवकालीन दुर्गरचना, किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यरचना आणि संरक्षणपद्धती, समुद्राशी असलेली जोडणी तसेच ऐतिहासिक लढायांतील भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कशेळीच्या कनकादित्य मंदिर परिसराला भेट देऊन या सूर्यमंदिराचा इतिहास, स्थापत्यशैलीबाबत माहिती मिळवली.
शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन इतिहास विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे, प्रा. मधुरा चव्हाण, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे शिक्षक निनाद तेंडुलकर यांनी केले. उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.
---