कोकण

सरकारनामासाठी

CD

मतदार यादीत नाव झळकलं अन् निःश्वास सोडला
दीपक पवार यांचा अनुभव ; मित्रांनी दिली साथ, रत्नागिरीतील प्रकार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी जवळजवळ निश्चित होत होती. त्यासाठीची सर्व तयारीही झाली; परंतु अचानक समजले की, मतदार यादीत आपली नावंच नाहीत आणि मोठा धक्का बसला. आता करायचे काय, असा प्रश्न होता. अखेर कायदेशीर मार्ग अवलंबला. त्यात जीवलग मित्रांनी साथ दिली. आकाशपाताळ एक केले आणि पुन्हा नावे मतदार यादीत झळकली, ही वस्तुस्थिती प्रभाग क्र. ५ मधील उमेदवार पूजा पवार यांचे पती दीपक पवार यांनी सांगितली.
रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मिळवण्याच्या हालचाली सुरू होत्या. तेव्हा घडलेल्या प्रकारावर दीपक पवार यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना मांडल्या आहेत. ते म्हणाले, मी राजस्थानला असताना आमचं नाव मतदार यादीतून गायब झाल्याची माहिती समजली. आमच्यासाठी हा धक्काच होता. हे आमच्या स्वप्नांवर पाणी फिरवणारं होतं. आज त्या प्रसंगाची आठवणं देखील नको वाटते. या दुःखात एक सुखाची आशा होती. नियतीने आमच्यासाठी डाव लिहिला होता; पण तो हाणून पाडला माझ्या मित्रांनी. ॲड. संकेत घाग, बिपिन बंदरकर या मित्रांनी आकाशपाताळ एक केलं आणि आमची नावं पुन्हा मतदार यादीत झळकली. मी आणि पूजा स्वतःहून पालकत्व स्वीकारून चार वर्षं प्रभाग क्रमांक पाचमध्ये राबत होतो. लोकांच्या एका फोनवर धावून जात होतो. त्यांच्या अडीअडचणी, समस्या आमच्या झाल्या होत्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीतून आमची नावं गायब होती. काय करावं समजेना. थोडं सावरल्यावर पहिला फोन बिपिन बंदरकर यांना केला. खरं, पण माझ्या तोंडचं पाणी पळालं होतं. बिपिनने मात्र विषयाचं गांभीर्य ओळखलं. संकेत घाग यांना सोबत घेतलं आणि आमची नावं पुन्हा मतदार यादीत आणूनच दोघांनी श्वास घेतला. बिपिन आणि संकेत या दोघांचीही सामाजिक ओळख वेगळी, खास असली तरीही माझ्यासाठी ते मित्र आहेत आणि त्यांनीही कठीण प्रसंगात माझ्यापाठी उभं राहून तेच सिद्ध केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage: पोळी, भाकरीलाही इंधनटंचाईचे ‘चटके’; प्रतिनग दोन ते पाच रुपयांनी दरवाढ

Ahilyanagar News: गुरुजींची बढतीसाठी खटपट! अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एजंटांनी टाकले गळ, नियमातील संदिग्धतेने फावले..

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT