कोकण

राजापूर ः राजापुरातील मोकाट गुरांचा प्रश्न जैसे थे

CD

rat21p14.jpg-
05823
राजापूर ः महामार्गावर रस्ता ओलांडणारी गुरे वाहतुकीला अडथळा करतात.
--------------
राजापुरातील मोकाट गुरांचा प्रश्न जैसे थे
कारवाईच्या सूचनेनंतरही कार्यवाही शून्य; निर्देशांच्या अंमलबजावणीकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २२ ः मोकाट गुरांची समस्या सोडवण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये विशेष बैठक झाली. यामध्ये प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून गावस्तरावर समित्या स्थापन करणे, पशुसंवर्धन विभागातर्फे गुरांचे शंभर टक्के टॅगिंग करणे यांसह गुरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या; मात्र, दोन दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयासमोरील पुलावर वाहनाच्या धडकेमध्ये बैलाच्या मृत्यूने अद्यापही ‘मोकाट गुरांचा प्रश्‍न जैसे थे’ असल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या काही वर्षापासून तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरामध्ये मोकाट गुरांच्या समस्येची तीव्रता अधिकच वाढली आहे. रस्त्यामध्ये बसलेल्या वा रस्ता ओलांडणाऱ्या मोकाट गुराला वाहनाची धडक बसून त्यामध्ये त्याचा मृत्यू होण्याची घटना घडते. प्रशासनाला ग्रामस्थांकडून निवेदनेही देण्यात आली. त्याची दखल घेऊन प्रशासनाकडून गेल्या महिन्यामध्ये बैठक झाली. त्या बैठकीमध्ये प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी प्रशासनाला मोकाट गुरांची समस्या सोडवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची सूचना केली होती. प्रशासन आणि ग्रामस्थांसमवेत झालेल्या या बैठकीमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करून गावस्तरावर समित्या स्थापन करणे, पशुसंवर्धन विभागातर्फे गुरांचे शंभर टक्के टॅगिंग करणे यांसह गुरांच्या मालकांवर आवश्यकतेप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयासमोरील पुलावर वाहनाची धडक बसून एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शहरासह महामार्गासह वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या रस्त्यांवर अनेकवेळा गुरे ठाण मांडून बसलेली दिसतात. या घटना पाहता मोकाट गुरांची समस्या अद्यापही जैसे थे आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी मोकाट जनावरांच्या नियंत्रणासाठी दिलेल्या निर्देशांची प्रशासनाकडून अंमलबजावणी होणार की नाही? त्याचवेळी शेतकरी पशुधन वाचवण्यासाठी गुरे मोकाट सोडण्याचे बंद होणार की नाहीत? असा सवाल आता वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

कोट
मोकाट गुरांची समस्या सोडवण्यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून गावस्तरावर समित्या स्थापन करणे, पशुसंवर्धन विभागातर्फे गुरांचे शंभर टक्के टॅगिंग करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. गुरांच्या मालकांवरही आवश्यकतेप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत; मात्र, त्याची प्रशासनाकडून अंमलबजावणी होणार कधी? मोकाट गुरांचे मालकाच्या मानसिकतेमध्ये बदलाव होणार कधी?
- राजेश शिंदे, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H5N5 Virus: 'बर्ड फ्लू'च्या दुर्मिळ विषाणूचा धोका वाढला, 'इथे' झाला पहिला मृत्यू; आरोग्य विभागाकडून निवेदन

Agriculture News : द्राक्षपंढरीची व्यथा! 80% उत्पादन घट, आता निर्यातक्षम द्राक्ष तपासणीच्या 10 हजार खर्चाचा बोजा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर

Latest Marathi News Live Update : पेण नगरपालिकेच्या वतीने मतदारांसाठी जनजागृती रॅली

आमदारांना ओळखलं नाही अन् उभा न राहिल्यानं डॉक्टरना, नोटीस बजावणं असंवेदनशील; हायकोर्टानं सरकारला फटकारलं

IND vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत, भारताच्या कुलदीप यादवला ३ विकेट्स; पहिल्या दिवशी काय घडलं?

SCROLL FOR NEXT