-rat२१p८.jpg-
२५O०५८१४
संगमेश्वर ः भागवत व प्रा. गजानन भागवत यांच्या तैलचित्राच्या अनावरणप्रसंगी मान्यवर.
----
अध्ययन, अकलनासाठी मातृभाषाच
परिसंवादातील सूर; ‘डी-कॅड’मध्ये आयोजन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २२ ः मराठी भाषेची अवहेलना होत असून, त्याला सत्ताधाऱ्यांबरोबरच आजकालचे पालकही दोषी आहेत. त्यासाठी मातृभाषेतच खरेखुरे अध्ययन व आकलन होऊ शकते, असे मुद्दे भाषासंस्कृती या विषयावरील चर्चेवेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी उपस्थितांपुढे मांडले.
देवरुखातील डी-कॅड कॉलेजमध्ये श्री. पु. भागवत यांच्या जन्मशताब्दी सांगतापूर्तीनिमित्त ‘कला-साहित्य-संस्कृती-व्यवहार’ या विषयावर अभ्यासकांचा एकदिवसीय परिसंवाद झाला. हा परिसंवाद अनुष्टुभ् प्रतिष्ठान आणि डी-कॅड कॉलेजने आयोजित केला होता. या परिसंवादाच्या सुरुवातीला प्रा. श्री. पु. भागवत आणि रंगतज्ञ प्रा. गजानन भागवत यांच्या तैलचित्राचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष अजय पित्रे यांच्या हस्ते झाले. परिसंवादाचे पहिले सत्र ‘लोकसंस्कृती’ या विषयावर झाले. त्यात चिपळूणचे लोकप्रिय शाहीर आणि लोककला अभ्यासक शाहीद खेरटकर यांनी विचार मांडले. प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी लोकसंस्कृतीच्या वैविध्याचा सविस्तर उलगडा केला. मुकुंद कुळे यांनी ग्रामजीवन व नागरसंस्कृतीमधील भेद स्पष्ट केला. दुसरे सत्र ‘भाषासंस्कृती’ या विषयावर आधारित होते. त्यात प्रा. दीपक पवार यांनी मराठी समाजात मराठी भाषेची होत असलेली अवहेलना मांडली.
----
चौकट
अधिक सूक्ष्मतेने चित्रांचे वाचन करा
आदिमानवाने रेषारेघोट्यांद्वारे आपले मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात केली. ती अभिव्यक्तीची प्रारंभीची अवस्था होती आणि पुढील काळात ती चित्रकला म्हणून समृद्ध झाली. त्या विविध काळातील चित्रांचे वाचन झाले पाहिजे. चित्र केवळ पाहण्यासाठी नसते तर ते वाचता आले पाहिजे, असे कादंबरीकार प्रा. वसंत डहाके यांनी सांगितले.